📖 वाचाल तर वाचाल 📖
📘आजचा परिपाठ📘
🇮🇳 राष्ट्रगीत 🇮🇳
🇮🇳 राज्यगीत 🇮🇳
🇮🇳प्रतिज्ञा🇮🇳
🇮🇳संविधान उद्देशिका🇮🇳
✒️✒️आज दिनांक :- २९ नोव्हेंबर २०२४
🔊🔊 आजचा वार:- शुक्रवार
📙📘सुविचार :- नम्रता आणि सद्गुणांनी जीवन अधिक सुंदर होते
📙📘📙 दिनविशेष
✒️✒️आजचा दिनविशेष – घटना
1877 : थॉमस एडिसनने प्रथम फोनोग्राफचे प्रात्यक्षिक केले.
1889 : बंगळुरूच्या लालबाग गार्डनमध्ये ‘ग्लास हाऊस’ची पायाभरणी करण्यात आली.
1996 : नोबेल पारितोषिक विजेत्या सामाजिक कार्यकर्त्या मदर तेरेसा यांना त्यांच्या मूळ अल्बानियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार गोल्डन ऑनरने सन्मानित करण्यात आले.
1999 : नारायणगाव, महाराष्ट्र येथे जगातील सर्वात मोठ्या मीटरवेव्ह रेडिओ दुर्बिणीचे उद्घाटन करण्यात आले.
2000 : शास्त्रीय गायक गुलाम मुस्तफा खान आणि घटम वादक टी. एच. विक्कू विनायक राम यांना उस्ताद हाफिज अली खान मेमोरियल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
2000 : दक्षिण आफ्रिकेचे माजी अध्यक्ष डॉ. नेल्सन मंडेला आणि बांगलादेशच्या ग्रामीण बँकेला गांधी शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
✒️✒️ आजचा दिनविशेष – जन्म
1869 : ‘अमृतलाल विठ्ठलदास ठक्कर’ – समाजसेवक यांचा जन्म. (मृत्यू : 20 जानेवारी 1951)
1907 : ‘गोपीनाथ तळवलकर’ – प्रसिद्ध लेखक यांचा जन्म. (मृत्यू : 7 जून 2000)
1908 : ‘एन. एस. क्रिश्नन’ – तमिळ चित्रपट अभिनेता यांचा जन्म.
1926 : ‘प्रभाकर नारायण पाध्ये’ – लेखक, पत्रकार यांचा जन्म. (मृत्यू : 30 ऑक्टोबर 1996)
1935 : ‘गुरबचन सिंग सलारिया’ – परमवीर चक्र प्राप्तकर्ता यांचा जन्म.
1971 : ‘बिपलब कुमार देब’ – भारताच्या त्रिपुरा राज्याचे 10 वे मुख्यमंत्री यांचा जन्म.
1977 : ‘युनिस खान’ – पाकिस्तानी क्रिकेटपटू यांचा जन्म.
✒️✒️ आजचा दिनविशेष – मृत्यू
1926 : ‘कृष्णाजी नारायण आठल्ये’ – ग्रंथकार, संपादक, टीकाकार, कवी व चित्रकार, केरळ कोकिळ या मासिकाचे संस्थापक व संपादक यांचे निधन.
1939 : ‘माधव त्र्यंबक पटवर्धन’ – मराठी भाषेतील कवी आणि रविकिरण मंडळाचे संस्थापक यांचे निधन. (जन्म : 21 जानेवारी 1894)
1950 : ‘बाया कर्वे’ – महर्षी अण्णासाहेब कर्वे यांच्या पत्नी यांचे निधन.
1959 : ‘गोविंद सखाराम सरदेसाई’ – मराठी इतिहासकार यांचे निधन. (जन्म : 17 मे 1865)
1993 : ‘जहांगीर रतनजी दादाभॉय टाटा’ – यांचे निधन. भारतीय उद्योजग तसेच ते भारताचे पहिले वैमानिक व भारतीय विमान वाहतुकीचे जनक यांचे निधन. (जन्म : 29 जुलै 1904)
2001 : ‘जॉर्ज हॅरिसन’ – बीटल्स चा गिटारवादक, संगीतकार, गायक आणि गीतलेखक यांचे निधन. (जन्म : 25 फेब्रुवारी 1943)
2011 : ‘इंदिरा गोस्वामी’ – आसामी साहित्यिक व कवियत्री यांचे निधन.
⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏭️⏭️⏮️⏮️⏭️⏮️
🌍 भाषेवर प्रभुत्व मिळवुया 🌍
📋 📖म्हणी व अर्थ📖 📋
👉 एका हाताने टाळी वाजत नाही – दोघांच्या भांडणात पूर्णपणे एकट्यालाच दोष देता येत नाही .
✒️📖 वाक्प्रचार 📖✒️
👉 अभिवादन करणे – वंदन करणे
✒️📖 शब्दसमुहाबद्दल एक शब्द 📖✒️
👉 नदीची सुरुवात होते ते ठिकाण – उगम
⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️
🙏 प्रार्थना 🙏
नमो भास्करा
नमो भास्करा दे अनोखा प्रकाश
तनाचा मनाचा कराया विकास
गतीच्या विकासास द्यावा प्रकाश
झणी होऊ दे दुर्गुणांचा विनाश
नमो शारदा मी तुझा नम्र दास
अशी बुद्धी देई मला तुचि खास
घडो मायभूमी अहर्निश सेवा
मनाला अहंकार कधी ना शिवावा।
📌📌 📝 बोधकथा 📝
साधु आणी जिज्ञासु तरुण
*‘एका साधूकडे एक जिज्ञासू* तरुण गेला आणि त्याने त्याला विचारले, ‘‘महाराज मुक्ती मिळण्यासाठी वनात जायला हवे का ?’’ साधू म्हणाला, ‘‘असे कोण म्हणतो ? तसे असते, तर जनक राजाला राजवैभवात राहूनही जी मुक्ती मिळाली, ती मिळाली असती का ?’’ साधूचे हे उत्तर ऐकून तो जिज्ञासू तरुण निघून गेला. थोड्या वेळात दुसरा एक जिज्ञासू त्या साधूकडे आला. त्याने त्याला तोच प्रश्न विचारला, ‘‘योगीराज, मुक्ती मिळवण्यासाठी घरादाराचा त्याग करून वनातच तपश्चर्येला गेले पाहिजे का ?’’ यावर तो साधू म्हणाला, ‘‘अर्थातच ! नाहीतर घरादाराचा त्याग करून शुक-सनकादी सारखे मोठमोठे साधक मुक्तीसाठी वनात गेले, ते काय मूर्ख होते ? ’’एकाच प्रश्नाला त्या साधूने दिलेली परस्पर विरोधी अशी उत्तरे ऐकून त्या साधूच्या सहवासात रहाणारा त्याचा शिष्य गोंधळात पडला. तो दुसरा तरुण तेथून निघून जाताच त्या शिष्याने त्या साधूला विचारले, ‘‘गुरुदेव, आपल्याकडे एका पाठोपाठ एक आलेल्या त्या दोन साधकांचा प्रश्न एकच असतांना आपण त्यांना परस्परविरोधी अशी दोन उत्तरे का दिलीत ? त्यातले सत्य उत्तर कोणते समजायचे ?’’ यावर तो साधू म्हणाला, ‘‘बाळ, मी दिलेली दोन्ही उत्तरे सत्य आहेत. माझ्याकडे जो पहिला प्रश्नार्थी आला होता तो एकीकडे प्रपंच करता करता जीवनमुक्तीसाठी आवश्यक असलेली साधना करू शकेल, अशा कुवतीचा होता; पण नंतर जो तरुण आला त्याला घरात राहून जीवनमुक्तीसाठी करावी लागणारी आवश्यक ती साधना करणे कठीण गेले असते; म्हणून मी त्या त्या प्रमाणे उदाहरणे देऊन त्यांना पटवून दिले.’’
तात्पर्य – योग्य वेळ आणि परिस्थिती पाहुन योग्य तो सल्ला देणे अचुक ठरेल.
📘 दिनांकानुसार पाढा :- २९ चा पाढा
२९ १७४
५८ २०३
८७ २३२
११६ २६१
१४५ २९०
⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️
📝प्रश्नावली 219📝
प्रश्न १. डिझेल इंजिनचा शोध १८९३ मध्ये कोणी लावला ?
उत्तर :- रूडाॅल्फ डिझेल.
प्रश्न २. निवडणुकीत बोटाला लावण्यात येणारया शाईमध्ये कोणता घटक असतो ?
उत्तर :- सिल्व्हर नायट्रेट.
प्रश्न ३. कोणताही दाता एकाच वेळी किती रक्तदान करू शकतो ?
उत्तर :- ४५० मिली.
प्रश्न ४. मानवी डोळा कोणत्या भिंगासारखे कार्य करतो ?
उत्तर :- बहिर्वक्र भिंग.
प्रश्न ५. भारतात जनगणना दर किती वर्षांनी होते ?
उत्तर :- दर दहा वर्षांनी
⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️
👉 आपल्या माहितीसाठी.
◾️भारतीय कृषी संशोधन संस्था : नवी दिल्ली
◾️केंद्रीय ऊस संशोधन केंद्र – लखनौ (उत्तरप्रदेश)
◾️केंद्रीय तांदूळ संशोधन संस्था : कटक
◾️ऑल इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स : नवी दिल्ली
◾️केंद्रीय तंबाखू संशोधन संस्था : राजमुंद्री
◾️भारतीय लाख संशोधन संस्था : रांची
◾️इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियम : डेहराडून
◾️केंद्रीय औषध संशोधन संस्था : लखनौ
◾️केंद्रीय जूट तंत्रज्ञान संशोधन संस्था : कोलकाता
◾️राष्ट्रीय साखर संशोधन संस्था : कानपूर
◾️राष्ट्रीय वनस्पति संशोधन संस्था : लखनौ
◾️सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च ऑन बफेलो : हिसार
◾️केंद्रीय बटाटा संशोधन संस्था :शिमला
◾️सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन : मुंबई
◾️केंद्रीय ऊस संशोधन केंद्र – लखनौ (उत्तरप्रदेश)
◾️केंद्रीय गहू संशोधन केंद्र – कर्नाल (हरियाणा)
◾️केंद्रीय आवळा संशोधन केंद्र – फैजाबाद (उत्तरप्रदेश)
◾️केंद्रीय नारळ संशोधन केंद – कासरगोड (केरळ)
◾️केंद्रीय केळी संशोधन केंद्र – कळांडूथोराई (तामिळनाडू)
◾️केंद्रीय डाळिंब संशोधन केंद्र – सांगोला, सोलापूर
◾️केंद्रीय द्राक्ष संशोधन केंद्र – मांजरी (पुणे)
◾️केंद्रीय दूध संशोधन केंद्र – कर्नाल (हरियाणा)
◾️केंद्रीय बटाटा संशोधन केंद्र – सिमला
◾️केंद्रीय संत्री संशोधन केंद्र – नागपूर
◾️केंद्रीय मेंढी व लोकर संशोधन केंद्र – अंबिकानगर (गुजरात)
◾️केंद्रीय गवत व चारा संशोधन केंद्र – झाशी (मध्यप्रदेश)
◾️केंद्रीय मधुमक्षिका संशोधन केंद्र – पुणे
◾️केंद्रीय काजू संशोधन केंद्र – पहूर
◾️केंद्रीय ताग संशोधन केंद्र – बराकपूर (पश्चिम बंगाल)
◾️केंद्रीय तंबाखू संशोधन केंद्र – राजमहेंद्री (आंध्रप्रदेश)
◾️केंद्रीय लिंबुवर्गीय फळ संशोधन केंद्र – नागपूर
◾️केंद्रीय सोयाबीन संशोधन केंद्र – इंदोर (मध्यप्रदेश)
◾️केंद्रीय कापूस संशोधन केंद्र – नागपूर
◾️केंद्रीय ज्वारी संशोधन केंद्र – राजेंद्रनगर (आंध्रप्रदेश)
◾️केंद्रीय अळंबी संशोधन केंद्र – सोलन
◾️केंद्रीय उंट संशोधन केंद्र – जोरबीट (राजस्थान)
◾️केंद्रीय ताग संशोधन केंद्र – बराकपूर (पश्चिम बंगाल)
◾️केंद्रीय लाख संशोधन केंद्र- रांची (झारखंड)
◾️केंद्रीय फळ संशोधन केंद्र – गणेशखिंड (पुणे)
◾️मसाला पीक संशोधन केंद्र – केरळ
◾️इंटरनॅशनल क्रॉप रिसर्च फॉर सेमीअॅरिड ट्रॉपिक्स – हैदराबाद (आंध्रप्रदेश)
◾️भारतीय मका संशोधन संस्था : नवी दिल्ली
◾️सागरी जीवन संसाधने आणि पर्यावरणशास्त्र केंद्र : केरळ
◾️केंद्रीय कापूस संशोधन संस्था : नागपूर
◾️इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल बायोलॉजी :कोलकाता
◾️केंद्रीय नारळ संशोधन संस्था :कासेरगोड, केरळ
◾️राष्ट्रीय दुग्ध संशोधन संस्था : कर्नाल (हरियाणा)
◾️विक्रम साराभाई अंतराळ केंद्र : तिरुवनंतपुरम
◾️सतीश धवन स्पेस सेंटर : श्रीहरीकोटा