ज्ञानाची वारी, आली आपल्या दारी.” प्रश्नावली 220.prashnavali 220

studykatta24.com
studykatta24.com - Teacher
10 Min Read

   📖 वाचाल तर वाचाल 📖

            📘 आजचा परिपाठ 📘


                        🇮🇳 राष्ट्रगीत 🇮🇳
                         🇮🇳 राज्यगीत 🇮🇳
                           🇮🇳प्रतिज्ञा🇮🇳
                     🇮🇳संविधान उद्देशिका🇮🇳

✒️✒️आज दिनांक :- २ डिसेंबर  २०२४
🔊🔊 आजचा वार:- सोमवार

📙📘सुविचार :- वय आणि पैसा यावर कधीच गर्व करू नका
कारण ज्या गोष्टी मोजता येतात त्या संपतातच.

📙📘📙 दिनविशेष

🌍🌍 आजचा जागतिक दिन

🎗️गुलामगिरीच्या निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस
🎗️संगणक साक्षरता दिन
🎗️प्रदूषण नियंत्रण दिन

✒️✒️ आजचा दिनविशेष – घटना


1984 : राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस.
1988 : बेनझीर भुट्टो यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. कोणत्याही मुस्लिम देशाच्या पंतप्रधान बनणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या.
1989 : विश्वनाथ प्रताप सिंग यांनी भारताचे 7 वे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.
1990 : स्पेस शटल कोलंबिया STS-35 वर प्रक्षेपित करण्यात आले, ASTRO-1 स्पेसलॅब वेधशाळा घेऊन गेले.
1993 : स्पेस शटल प्रोग्राम : STS-61 : हबल स्पेस टेलिस्कोपच्या दुरुस्तीच्या मोहिमेवर NASA ने स्पेस शटल एंडेव्हर लाँच केले.
1999 : दोन विधेयके, एक काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी आणि दुसरे परकीय चलन व्यवस्थापन (FEMA) नियंत्रित करण्यासाठी लोकसभेत मंजूर करण्यात आले.
2001 : एनरॉनने दिवाळखोरी जाहीर केली.

✒️✒️ आजचा दिनविशेष – जन्म

1855 : ‘सर नारायण गणेश चंदावरकर’ – कायदेपंडित, समाजसुधारक, मुंबई उच्‍च न्यायालयाचे न्यायाधीश यांचा जन्म. (मृत्यू : 14 मे 1923)
1898 : ‘इन्दर लाल रॉय’ – पहिल्या महायुद्धातील भारतीय पायलट यांचा जन्म. (मृत्यू : 22 जुलै 1918)
1905 : ‘अनंत काणेकर’ – सोविएत लँड नेहरू पुरस्कार विजेते मराठी साहित्यिक यांचा जन्म.
1937 : ‘मनोहर जोशी’ – महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री यांचा जन्म.
1942 : ‘डॉ. अनिता अवचट’ – मुक्तांगणच्या संस्थापिका यांचा जन्म.
1947 : ‘धीरज पारसणा’ – भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्म.
1959 : ‘बोमन ईराणी’ – अभिनेते यांचा जन्म.
1972 : ‘सुजित सोमसुंदर’ – भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्म.

✒️✒️ आजचा दिनविशेष – मृत्यू

1906 : ‘बाळाजी प्रभाकर मोडक’ – कालाजंत्रीकार आणि आद्य विज्ञान प्रसारक यांचे निधन.
1980 : ‘चौधरी मुहम्मद अली’ – पाकिस्तानचे 4थे पंतप्रधान यांचे निधन. (जन्म : 15 जुलै 1905)
1996 : ‘एम. चेन्‍ना रेड्डी’ – आंध्र प्रदेशचे 11वे मुख्यमंत्री यांचे निधन. (जन्म : 13 जानेवारी 1919 – पेड्डामंगलम, मोईनाबाद, आंध्र प्रदेश)
2014 : ‘ए आर अंतुले’ – महाराष्ट्राचे 8 वे मुख्यमंत्री यांचे निधन. (जन्म : 9 फेब्रुवारी 1929)


🌍📝 जागतिक दिन लेख :

                 📝 संगणक साक्षरता दिन
    
           संगणक साक्षरता दिन (Computer Literacy Day) दरवर्षी 2 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. या दिवसाचे उद्दिष्ट म्हणजे संगणक आणि तंत्रज्ञानाविषयी जनजागृती करणे, त्याचा योग्य वापर शिकवणे, आणि डिजिटल युगात प्रत्येकाला सक्षम बनवणे आहे.आजच्या काळात संगणक साक्षरता ही जीवनातील एक महत्त्वाची गरज बनली आहे. संगणकाचा वापर शिक्षण, रोजगार, व्यवसाय, आणि दैनंदिन जीवनातील विविध कामांसाठी होतो. मात्र, अजूनही अनेक लोक संगणक वापरण्यात मागे आहेत, विशेषतः ग्रामीण भागातील लोकसंख्या.
              या दिवशी विविध शाळा, महाविद्यालये, आणि संस्थांमध्ये संगणक साक्षरता शिबिरे, कार्यशाळा, आणि प्रात्यक्षिक सत्रे आयोजित केली जातात. डिजिटल साधनांचा योग्य उपयोग, डेटा सुरक्षा, आणि ऑनलाइन साक्षरतेचे महत्त्व लोकांना पटवून दिले जाते.संगणक साक्षरता दिन आपल्याला तंत्रज्ञानाचे महत्त्व समजावून देतो आणि समाजातील प्रत्येक घटकाला डिजिटल शिक्षणाद्वारे प्रगती करण्यासाठी प्रेरित करतो. हा दिवस डिजिटल विभाजन संपवण्याचा संदेश देतो.

                   📝 प्रदूषण नियंत्रण दिन

                प्रदूषण नियंत्रण दिन (Pollution Control Day) दरवर्षी 2 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. 1984 साली भोपाळ गॅस दुर्घटनेत हजारो लोकांचा मृत्यू झाला होता, त्यांची स्मृती जपण्यासाठी आणि प्रदूषण नियंत्रणाचे महत्त्व समजावण्यासाठी हा दिवस पाळला जातो.प्रदूषण हे मानवजातीसमोरील एक गंभीर आव्हान आहे. हवा, पाणी, माती, आणि ध्वनी प्रदूषणामुळे पर्यावरणाची हानी होत असून, मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. औद्योगिक कचरा, वाहनांचा धूर, प्लास्टिकचा वापर, आणि रासायनिक घटक ही प्रदूषणाची मुख्य कारणे आहेत.
                 या दिवशी विविध कार्यक्रम, कार्यशाळा, आणि मोहिमा राबवल्या जातात, ज्यामध्ये पर्यावरण संरक्षणाचे उपाय आणि प्रदूषण नियंत्रणाच्या पद्धती शिकवल्या जातात. लोकांना पुनर्वापर, पुनर्विकसन, आणि हरित जीवनशैलीचे महत्त्व पटवले जाते.प्रदूषण नियंत्रण दिन आपल्याला पर्यावरण रक्षणासाठी जबाबदारीची जाणीव करून देतो. स्वच्छ आणि हरित भविष्यासाठी आपण सर्वांनी प्रदूषण कमी करण्यासाठी योगदान द्यायला हवे.

⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏭️⏭️⏮️⏮️⏭️⏮️
   
            🌍 भाषेवर प्रभुत्व मिळवुया 🌍

           📋 📖म्हणी व अर्थ📖 📋

👉 देश तसा वेश – परिस्थितीप्रमाणे बदलणारे वर्तन.

            ✒️📖 वाक्प्रचार 📖✒️

👉 हस्तगत करणे – ताब्यात घेणे.

     ✒️📖 शब्दसमुहाबद्दल एक शब्द 📖✒️

👉 नदीच्या दोन्ही बाजूंचा सुपीक प्रदेश – खोरे

⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️

                      🙏 प्रार्थना 🙏

                   जयोस्तुते..
जयोस्त्तु ते श्रीमहन्मंगले। शिवास्पदे शुभदे्
स्वतंत्रते भगवति। त्वामहं यशोयुतां वंदे ।।धृ।।

राष्ट्राचे चैतन्य मूर्त तूं, नीति संपदांची
स्वतंत्रते भगवति। श्रीमती राज्ञी तू त्यांची
परवशतेच्या नभांत तूंची आकाशी होशी
स्वतंत्रते भगवती। चांदणी चमचम लखलखशी।।

गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली
स्वतंत्रते भगवती। तूच जी विलसतसे लाली
तूं सुर्याचे तेज उदधिचे गांभीर्यहि तूंची
स्वतंत्रते भगवती। अन्यथा ग्रहण नष्ट तेंची ।।

मोक्ष मुक्ति ही तुझीच रुपें तुलाच वेदांती
स्वतंत्रते भगवती। योगिजन परब्रम्ह वदती
जे जे उत्तम उदात्त उन्नत महन्मधुर तें तें
स्वतंत्रते भगवती। सर्व तव सहचारी होते ।।

हे अधम रक्त रंजिते । सुजन-पुजिते । श्री स्वतंत्रते
तुजसाठिं मरण तें जनन
तुजविण जनन ते मरण
तुज सकल चराचर शरण
भरतभूमीला दृढालिंगना कधिं देशिल वरदे
स्वतंत्रते भगवति। त्वामहं यशोयुतां वंदे।।

हिमालयाच्या हिमसौधाचा लोभ शंकराला
क्रिडा तेथे करण्याचा कां तुला वीट आला
होय आरसा अप्सरसांना सरसे करण्याला
सुधाधवल जान्हवीस्त्रोत तो कां गे त्वां त्यजिला ।।

स्वतंत्रते । ह्या सुवर्णभूमीत कमती काय तुला
कोहिनूरचे पुष्प रोज घे ताजें वेणीला
ही सकल-श्री-संयुता आमची माता भारती असतां
कां तुवां ढकलुनी दिधली
पूर्वीची ममता सरली
परक्यांची दासी झाली
जीव तळमळे, कां तूं त्यजिले ऊत्तर ह्याचें दे
स्वतंत्रते भगवति। त्वामहं यशोयुतां वंदे।।
-स्वातंत्र्यवीर सावरकर


           📌📌     📝 बोधकथा 📝

                        दुहीचे फळ
  
    एक शिका-याने पक्षयांना  पकडण्यासाठी एक जाळे पसरविले. त्यात दोन पक्षी अडकले. परंतु त्यांनी परस्पर विचार करून ताबडतोब त्या जाळ्यासकट उडण्यास सुरवात केली.
      शिका-याला ते पाहून दुःख झाले; तरीही तो जमिनीवरून पक्षयांकडे पाहत त्या दिशेने पळत सुटला. एका माणसाने बसल्या बसल्या हे दृश्य पहिले.त्याने शिका-याला जवळ बोलावून विचारले. “तू विनाकारण का पळत आहेस? पक्षी तर जाळे घेऊन आकाशात उडत आहे.” शिकारी म्हणाला, ” आता या पक्षामध्ये मित्रता आहे. परस्पर मेळ साधून ते एकाच दिशेने उडत आहेत. म्हणूनच ते माझे जाळे पळवू शकले; परंतु थोड्या वेळाने त्यांच्यात भांडण किंवा कुरबुर होऊ शकते. मी त्यांच्या मागे या अपेक्षेने धावत आहे.
जेव्हा एकमेकांशी भांडण केल्यामुळे जाळे व ते खाली पडतील त्यावेळेस मी त्यांना पकडीन”.
           शिकारी म्हणाला, ते खरे ठरले थोड्या वेळाने ते पक्षी दमले. तेव्हा आपण कुठे उतरायचे यावरून त्यांच्यात मतभेद निर्माण झाला. सामंजस्य नाहीसे झाल्यामुळे उडण्याची दिशा  व पंखांची गती सारखी राहिली नाही. त्यामुळे ते जाळे सांभाळू शकले नाहीत. जाळ्याच्या भाराने अडकत ते पण खाली पडावयास लागले व जाळ्यात अडकले. त्यांचे पंखदेखील गुरफटले गेले. परिणामतः जाळ्यासकट ते जमिनीवर पडले.  शिका-याने त्यांना सहज पकडले.

   ⏭️ तात्पर्य :-  एकीत बळ असते. दुहीने आपला नाश होतो.

                             
📘 दिनांकानुसार पाढा :- २ चा पाढा

                                 २            १२
                                 ४            १४
                                 ६            १६
                                 ८            १८
                                 १०          २०

  ⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️ 

               📝 प्रश्नावली 220 📝



प्रश्न १. चादर उत्पादनासाठी कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे?
उत्तर :- सोलापूर

प्रश्न २. संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना केंव्हा करण्यात आली ?
उत्तर :- १९४५

प्रश्न ३. भारतातील पहिला लोहमार्ग कोणता ?
उत्तर :- ठाणे ते मुंबई

प्रश्न ४. सहारा हे जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणत्या खंडात आहे ?
उत्तर :- आफ्रिका

प्रश्न ५. सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक कोणी लिहिले ?
उत्तर :- महात्मा ज्योतिबा फुले.

⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️

👉 आपल्या माहितीसाठी.

भारतीय बँकांविषयी महत्त्वपूर्ण माहिती.

▪️भारतातील पहिली बँक: बँक ऑफ
     हिंदुस्तान   
▪️भारतीयांनी स्थापन केलेली पहिली बँक :
   अवध कमर्शिअल
▪️पहिली पूर्ण भारतीय बँक : पंजाब नॅशनल
     बँक
▪️भारतातील सर्वात मोठी बँक : SBI
▪️भारतातील सर्वात मोठी खाजगी बँक :
     ICICI Bank
▪️भारतातील सर्वात मोठा समुह : राष्ट्रीयीकृत
     बँकांचा समूह
▪️जगातील सर्वात मोठी बँक : बँक ऑफ
     चायना
▪️भारतात सर्वाधिक शाखा परकीय बँक :
    स्टॅन्डर्ड  चार्टर्ड बँक, यु. के.
▪️परदेशात सर्वाधिक शाखा भारतीय बँक :
    SBI
▪️सर्वाधिक देशांमध्ये कार्यरत भारतीय बँक :
     SBI
▪️भारतात चेकची व्यवस्था सुरू करणारी
     पहिली बँक : बेंगाल बँक
▪️भारतात पहिली बचत बँक सुरू करणारी :
     प्रेसिडेन्सी बँक ऑफ बेंगाल
▪️इंटरनेट बँकिंग सुरू करणारी पहिली बँक :
    ICICI Bank
▪️क्रेडिट कार्ड सुरू करणारी पहिली बँक :
    Central Bank
▪️ए. टी. एम. सुरू करणारी पहिली बँक :    
    HSBC
▪️म्युच्युअल फंड सुरू करणारी पहिली बँक :
    SBI
▪️सर्वात जुनी सार्वजनिक क्षेत्रातील बँक :
    अलाहाबाद बँक

Share This Article