📖 वाचाल तर वाचाल 📖
📘आजचा परिपाठ 📘
🇮🇳 राष्ट्रगीत 🇮🇳
🇮🇳 राज्यगीत 🇮🇳
🇮🇳प्रतिज्ञा🇮🇳
🇮🇳संविधान उद्देशिका🇮🇳
✒️✒️आज दिनांक :- ३ डिसेंबर २०२४
🔊🔊 आजचा वार:- मंगळवार
📙📘सुविचार :- कधीकधी अपमान सहन केल्याने कमीपणा येत नाही, उलट आपले सामर्थ्य वाढते.
📙📘📙 दिनविशेष
🌍🌍 आजचा जागतिक दिन
🎗️दिव्यांग व्यक्तींचा आंतरराष्ट्रीय दिवस
🎗️वकील दिन
✒️✒️ आजचा दिनविशेष – घटना
1796 : दुसरा बाजीराव मराठा साम्राज्याचा पेशवा बनला.
1829 : लॉर्ड विल्यम बँटिंगने सती प्रथेवर बंदी घातली.
1870 : बॉम्बे म्युच्युअल लाइफ ॲश्युरन्स सोसायटी, भारतातील पहिली विमा कंपनी स्थापन झाली.
1971 : पाकिस्तानने भारतावर हल्ला केला.
1984 : भोपाळ वायू दुर्घटना – भोपाळमधील युनियन कार्बाईड या कारखान्यातून मेथिल आयसोसायनेट या विषारी वायूची गळती होऊन सुमारे चौदाशे लोक लगेच मृत्युमुखी पडले तर नंतरच्या काही वर्षांत मृतांची एकूण संख्या सुमारे 20,000 इतकी झाली.
1992 : जागतिक अपंग दिन.
✒️✒️ आजचा दिनविशेष – जन्म
1776 : ‘श्रीमंत यशवंतराव होळकर’ – होळकर साम्राज्याचे महाराजा यांचा जन्म. (मृत्यू : 28 ऑक्टोबर 1811)
1882 : ‘नंदलाल बोस’ – जगविख्यात चित्रकार यांचा जन्म. (मृत्यू : 16 एप्रिल 1966)
1884 : ‘डॉ. राजेंद्र प्रसाद’ – भारताचे पहिले राष्ट्रपती यांचा जन्म. (मृत्यू : 28 फेब्रुवारी 1963)
1889 : ‘खुदिराम बोस’ – मुझफ्फरनगर बॉम्बस्पोटातील क्रांतिकारक यांचा जन्म. (मृत्यू : 11 ऑगस्ट 1908)
1892 : ‘माधव केशव काटदरे’ – कवी यांचा जन्म. (मृत्यू : 3 सप्टेंबर 1958)
1894 : ‘दिवा जिवरतीनम’ – भारतीय वकील आणि राजकारणी यांचा जन्म. (मृत्यू : 25 मार्च 1975)
1899 : ‘रमादेवी चौधरी’ – भारतीय स्वातंत्र्यसैनिक यांचा जन्म.
1937 : ‘विनोद बिहारी वर्मा’ – मैथिली लेखक यांचा जन्म.
1947 : ‘अॅलिस श्वार्झर’ – एमा मॅगझीनच्या संस्थापीका यांचा जन्म.
1950 : ‘एच. लक्ष्मीनारायणस्वामी दत्तू’ – भारताचे ४२वे सरन्यायाधीश यांचा जन्म.
✒️✒️आजचा दिनविशेष – मृत्यू
1552 : ‘सेंट फ्रान्सिस झेविअर’ – ख्रिस्ती धर्मप्रसारक यांचे निधन. (जन्म : 7 एप्रिल 1506)
1888 : ‘कार्ल झैस’ – ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट चे निर्माते यांचे निधन. (जन्म : 11 सप्टेंबर 1816)
1894 : ‘आर. एल. स्टीव्हनसन’ – इंग्लिश लेखक व कवी यांचे निधन. (जन्म : 13 नोव्हेंबर 1850)
1951 : ‘बहिणाबाई चौधरी’ – कवियत्री यांचे निधन. (जन्म : 24 ऑगस्ट 1880)
1956 : ‘माणिक बंदोपाध्याय’ – भारतीय लेखक, कवी आणि नाटककार यांचे निधन. (जन्म : 19 मे 1908)
1989 : ‘मेजर ध्यानचंद’ – भारतीय हॉकीपटू यांचे निधन. (जन्म : 29 ऑगस्ट 1905)
2011 : ‘देव आनंद’ – हिंदी चित्रपट अभिनेते यांचे निधन. (जन्म : 26 सप्टेंबर 1923)
🌍✒️ जागतिक दिन लेख
दिव्यांग व्यक्तींचा आंतरराष्ट्रीय दिवस
आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिन (International Day of Persons with Disabilities) दरवर्षी 3 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रसंघाने 1992 मध्ये हा दिवस सुरू केला, ज्याचे उद्दिष्ट दिव्यांग व्यक्तींच्या हक्कांचे संरक्षण करणे, त्यांच्या गरजा समजून घेणे, आणि समाजात त्यांचा समावेश वाढवणे आहे.
दिव्यांगत्व हे केवळ शारीरिक किंवा मानसिक मर्यादा नसून, योग्य संधी दिल्यास दिव्यांग व्यक्तीही स्वतःच्या क्षमतांद्वारे समाजात महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकतात. यासाठी शिक्षण, रोजगार, आरोग्यसेवा, आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून त्यांना सहाय्य करणे गरजेचे आहे.या दिवशी विविध कार्यक्रम, चर्चासत्रे, आणि दिव्यांग व्यक्तींसाठी प्रेरणादायी उपक्रम आयोजित केले जातात. सार्वजनिक ठिकाणी त्यांच्यासाठी सुलभ सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जातो.
आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिन आपल्याला समानता, समावेश, आणि सन्मानाचे मूल्य समजावून देतो. दिव्यांग व्यक्तींना संधी देऊन त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी आहे.
⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏭️⏭️⏮️⏮️⏭️⏮️
🌍 भाषेवर प्रभुत्व मिळवुया 🌍
📋 📖म्हणी व अर्थ📖 📋
👉 अति खाणे मसनात जाणे – अति खाणे नुकसानकारक असते .
✒️📖 वाक्प्रचार 📖✒️
👉 ऐट मिरवणे – तोरा मिरवणे
✒️📖 शब्दसमुहाबद्दल एक शब्द 📖✒️
👉 खूप जोरात किंवा एक सारख्या टाळ्या वाजवणे – टाळ्यांचा कडकडाट
⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️
🙏 प्रार्थना 🙏
या लाडक्या मुलांनो
या लाडक्या मुलांनो, तुम्ही मला आधार ।
नव हिंदवी युगाचे, तुम्हीच शिल्पकार ॥धृ।।
आईस देव माना, वंदा गुरुजनांना।
जगी भावनेहुनी या, कर्तव्य थोर जाणा ।
गंगेपरी पवित्र, ठेवा मनी विचार ॥१॥
शिवबापरी जगांत, दिलदार थोर व्हावे।
टिळकापरी सदैव, ध्येयास त्या स्मरावें।
जे चांगलें जगी या, त्याचा करा स्वीकार।।२।।
शाळेत रोज जाता, ते ज्ञान-बिंदु मिळवा।
हृदयांत आपुल्या त्या देशाभिमान ठेवा।
कुलशील थोर माना, ठेवू नका विकार ॥३॥
📌📌 📝 बोधकथा 📝
ऐकावे जनाचे, करावे मनाचे
एक म्हातारा व त्याचा मुलगा आपला घोडा विकण्यासाठी बाजारात चालले असता वाटेत एक माणूस त्या म्हातार्याला म्हणाला, ‘हा लहान मुलगा पायी चालला आहे, त्यापेक्षा तू त्याला घोड्यावर बसव.’ ते ऐकताच म्हातार्याने मुलाला घोड्यावर बसविले व आपण लगाम धरून चालू लागला. पुढे दुसरा माणूस त्या मुलाला म्हणाला, ‘आळशी पोरा, तुझा म्हातारा बाप पायी चालत असताना तुला घोड्यावर बसून जायची लाज वाटत नाही का?’ ते ऐकताच म्हातार्याने मुलाला खाली उतरवले व आपण घोड्यावर बसून निघाला. थोडे पुढे जाताच दोन स्त्रिया त्यांच्याकडे बोट दाखवून म्हणाल्या, ‘म्हातारा पहा, लहान मूल पायी चाललं असता आपण घोड्यावर बसून कसा चालला आहे?’ ते ऐकताच त्याने मुलाला आपल्या मागे घोड्यावर बसवून घेतले. ते आणखी थोडे पुढे जाताच तोच एक माणूस त्यांना विचारतो, ‘हा घोडा तुमचाच का?’ म्हातारा म्हणाला, ‘हो.’ माणूस म्हणाला, ‘मला काही खरं वाटत नाही, कारण हा जर तुमचा असता तर तुम्ही त्याचे असे हाल केले नसते. दोघंही त्याच्या पाठीवर बसून चालला आहात, त्यापेक्षा तुम्हीच त्याला उचलून का घेत नाही?’ ते ऐकताच दोघेही घोड्यावरून खाली उतरले व त्या घोड्याला आडवे करून त्यांनी त्याचे पाय बांधले. मग त्यात एक वेळू घालून तो त्यांनी आपल्या खांद्यावर घेतला व पुढे निघाले.
ते पाहून रस्त्यातील सगळे लोक टाळया पिटून मोठमोठ्याने हसू लागले. तो आवाज ऐकून घोडा बिचकला व त्याने आपले पाय झाडून पायाला बांधलेले दोर तोडून टाकले. दोर तुटताच खाली नदी होती तिच्यात तो पडला व बुडून मरण पावला.
तात्पर्य – प्रत्येकजण वेगवेगळ्या प्रकारच्या सूचना देतात त्या ऐकून घेऊन त्याप्रमाणे वागणे व प्रत्येकाला खूष करणे हे काम फार कठीण आहे.
📘 दिनांकानुसार पाढा :- ३ चा पाढा
३ १८
६ २१
९ २४
१२ २७
१५ ३०
⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️
📝 प्रश्नावली 221 📝
प्रश्न १. राजमाता जिजाबाई यांची समाधी कोठे आहे ?
उत्तर — पाचाड ( रायगड )
—————————————-
प्रश्न २. शांतीनिकेतनची स्थापना कोणी केली ?
उत्तर :- रविंद्रनाथ टागोर
—————————————-
प्रश्न ३.महात्मा गांधीचे पूर्ण नाव काय आहे ?
उत्तर :- मोहनदास करमचंद गांधी
—————————————-
प्रश्न ४.छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य स्थापनेची शपथ कोणत्या मंदिरात घेतली ?
उत्तर :- रायरेश्वर
—————————————-
प्रश्न ५ शिवाजी महाराजांनी लाल महालावर छापा टाकून कोणाची बोटे छाटली ?
उत्तर :- शाहिस्तेखान
⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️
👉आपल्या माहितीसाठी
*नवीन पुरस्कार 2024.*
✅ 32 वा एकलव्य पुरस्कार 2024 :- प्रत्यासा रे
✅ ५४ वा दादासाहेब फाळके पुरस्कार :- मिथुन चक्रवर्ती
✅ IIFA पुरस्कार 2024 सर्वोत्कृष्ट अभिनेता:- शाहरुख खान
✅ दिवंगत वासुदेव गायतोंडे जीवनगौरव पुरस्कार :- लक्ष्मण श्रेष्ठ
✅ विष्णुदास भावे गौरव पदक 2024 :- सुहासिनी जोशी
✅ मध्य प्रदेश सरकारचा किशोर कुमार सन्मान 2023 :- राजकुमार हिराणी
✅ IAF जागतिक अंतराळ पुरस्कार:- एस. सोमनाथ
✅ फिजी सर्वोच्च नागरी पुरस्कार 2024 :- श्री श्री रविशंकर
✅ 2024 बुकर पुरस्कार :- सामंथा हार्वे
✅ ‘इंदिरा गांधी शांतता पुरस्कार’ 2023 :- डॅनियल बरेणबोईन व अली अली अबू अवाद