ज्ञानाची वारी आली आपल्या दारी प्रश्नावली 222. Prashnavali 222

studykatta24.com
studykatta24.com - Teacher
10 Min Read

  📖 वाचाल तर वाचाल  📖

         📘आजचा परिपाठ📘


                        🇮🇳 राष्ट्रगीत 🇮🇳
                         🇮🇳 राज्यगीत 🇮🇳
                           🇮🇳प्रतिज्ञा🇮🇳
                     🇮🇳संविधान उद्देशिका🇮🇳

✒️✒️आज दिनांक :- डिसेंबर  २०२४
🔊🔊 आजचा वार:- शुक्रवार

📙📘सुविचार :- शञूची व रोगाची उपेक्षा करु नये

📙📘📙 दिनविशेष

🌍🌍 आजचा जागतिक दिन



🎗️ भारतीय होमगार्ड स्थापना दिन

✒️✒️ आजचा दिनविशेष – घटना

1917 : फिनलँड रशियापासुन स्वतंत्र झाला.
1921 : ब्रिटिश आणि आयरिश प्रतिनिधींनी लंडनमध्ये अँग्लो-आयरिश करारावर स्वाक्षरी केली.
1922 : अँग्लो-आयरिश करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर एक वर्षानंतर, आयरिश मुक्त राज्य अस्तित्वात आले.
1946 : भारतीय होमगार्ड संघटनेची स्थापना झाली
1971 : भारताने बांगलादेशला मान्यता दिल्यानंतर पाकिस्तानने भारताशी राजनैतिक संबंध तोडले
2000 : थोर समाजसेवक बाबा आमटे यांना राष्ट्रपती के.आर. नारायणन यांच्या हस्ते केंद्र सरकारचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.
2006 : नासाने मार्स ग्लोबल सर्वेअरने मंगळावर द्रव पाण्याची उपस्थिती दर्शविणारी छायाचित्रे उघड केली.

✒️✒️ आजचा दिनविशेष – जन्म

1732 : ‘वॉरन हेस्टिंग्ज’ – भारताचे पहिले गव्हर्नर जनरल यांचा जन्म. (मृत्यू : 22 ऑगस्ट 1818)
1853 : ‘हरप्रसाद शास्त्री’ – संस्कृत विद्वान, शिक्षणतज्ञ, इतिहासकार यांचा जन्म. (मृत्यू : 17 नोव्हेंबर 1931)
1861 : ‘नारायण वामन टिळक’ – कवी यांचा जन्म. (मृत्यू : 9 मे 1919)
1916 : ‘जयराम शिलेदार’ – गंधर्व भूषण, मराठी गायक, नाट्य-चित्रपट अभिनेते यांचा जन्म. (मृत्यू : 6 नोव्हेंबर 1992)
1923 : ‘वसंत सबनीस’ – लेखक व पटकथाकार यांचा जन्म. (मृत्यू : 15 ऑक्टोबर 2002)
1932 : ‘कमलेश्वर’ – पद्मभूषण पुरस्कार विजेते हिन्दी लेखक, पटकथालेखक, दूरदर्शनचे अतिरिक्त संचालक यांचा जन्म. (मृत्यू : 27 जानेवारी 2007)
1945 : ‘शेखर कपूर’ – अभितेने यांचा जन्म.
1948 : ‘सुचेता भिडे-चापेकर’ – भरतनाट्यम नृत्यांगना यांचा जन्म.
1950 : ‘निरूपमा राव’ – भारतीय विदेश सेवा (आयएफएस) अधिकारी यांचा जन्म.
1985 : ‘आर. पी. सिंग’ – भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्म
1988 : ‘रवींद्र जडेजा’ – भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्म
1993 : ‘जसप्रीत बुमराह’ – भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्म
1994 : ‘श्रेयस अय्यर’ – भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्म

✒️✒️ आजचा दिनविशेष – मृत्यू

1956 : ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ – भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार यांचे निधन. (जन्म : 14 एप्रिल 1891)
1971 : ‘कमलाकांत वामन केळकर’ – भारतातील भूविज्ञान अध्ययनाचा पाया घालणारे वैज्ञानिक यांचे निधन. (जन्म : 1 जानेवारी 1902)

✒️🌍 जागतिक दिन लेख
               भारतीय होमगार्ड स्थापना दिन
                भारतीय होमगार्ड स्थापना दिन (Indian Home Guard Raising Day) दरवर्षी 6 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. 1946 साली होमगार्ड संघटनेची स्थापना झाली, ज्याचे उद्दिष्ट देशाच्या अंतर्गत सुरक्षेत आणि आपत्ती व्यवस्थापनात महत्त्वाची भूमिका बजावणे हे होते.
                होमगार्ड ही एक स्वयंसेवी सुरक्षा संघटना आहे, जी नागरिकांना संरक्षण देण्यासाठी तयार करण्यात आली आहे. आपत्ती, आपत्ती निवारण, गर्दी नियंत्रण, वाहतूक व्यवस्थापन, आणि आपत्कालीन परिस्थितीत होमगार्ड महत्त्वपूर्ण सेवा देतात. पोलीस आणि प्रशासनाला सहकार्य करताना ते समाजाच्या सुरक्षेसाठी निःस्वार्थपणे कार्य करतात.या दिवशी होमगार्ड सदस्यांच्या समर्पणाचे कौतुक केले जाते. त्यांच्या योगदानाला मान्यता देण्यासाठी विविध कार्यक्रम आणि परेड आयोजित केल्या जातात.
                  भारतीय होमगार्ड स्थापना दिन आपल्याला देशाच्या सुरक्षेसाठी त्यांच्या कार्याची जाणीव करून देतो आणि त्यांच्या कर्तव्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी प्रदान करतो. हा दिवस त्यांच्या धैर्य आणि निष्ठेचा सन्मान करण्याचा आहे.
⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏭️⏭️⏮️⏮️⏭️⏮️
   
            🌍 भाषेवर प्रभुत्व मिळवुया 🌍

           📋 📖म्हणी व अर्थ📖 📋

👉 न कर्त्याचा वार शनिवार– न करण्याचे काम कारण सांगून टाळणे

            ✒️📖 वाक्प्रचार 📖✒️

👉  ऐट मिरवणे – तोरा मिरवणे

     ✒️📖 शब्दसमुहाबद्दल एक शब्द 📖✒️

👉 जाणून घेण्याची इच्छा – जिज्ञासा

⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️

                      🙏 प्रार्थना 🙏

              हे करुणाकरा ईश्वरा
    
हे करुणाकरा, ईश्वरा । कृपादान मज देई
तुजविण कोण निवारी संकट । दृढता ही तव पायी ॥

तूही आदि तू अनंत । तूही दु:स्तर भवनिधि तारक
तानसेन प्रभु तुम्ही उद्धरा ॥


                   📝 बोधकथा 📝

               एकीचे बळ सर्वश्रेष्‍ठ
 
       एका जातक कथेतील वर्णनानुसार वाराणसीलगत एका गावातील एक सुतार रोज जंगलात जात असे. एकदा त्‍याने खड्ड्यात पडलेल्‍या जंगली कुत्र्याच्‍या पिलाचा जीव वाचवला तेव्‍हापासून त्‍याला त्‍या पिलाचा लळा लागला. ते पिलू त्‍याला तेथे भेटत होते. ते पाहून इतरही जंगली कुत्रे त्‍याच्‍याजवळ येत असत. परंतु त्‍यांना सर्वांना एका वाघाने फार त्रस्‍त करून सोडले होते. तो रोज त्‍यांच्‍यावर हल्ले करत होता. सुताराने एक योजना बनविली. नेहमीप्रमाणे वाघ डोंगराच्‍या माथ्‍यावर आला. सर्व कुत्री वेगवेगळ्या ठिकाणी थांबून त्‍याच्‍यावर भुंकु लागली. वाघाने चवताळून एका कुत्र्यावर झेप घेतली तसा तो कुत्रा खाली बसला. वाघाची उडी थेट त्‍या कुत्र्याच्‍या मागे असणा या एका मोठ्या खड्ड्यात पडली. सगळ्या कुत्र्यांनी त्‍याच्‍यावर धाव घेतली व त्‍याच्‍यावर हल्‍ला करून त्‍याला ठार केले.

      📌  तात्पर्य – एकीचे बळ मोठे असते..


                 📘 दिनांकानुसार पाढा :- ५ चा पाढा

                                 ६             ३
                                 १२           ४२
                                 १८           ४
                                 २४           ५४
                                 ३०           ६०

  ⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️ 

                📝 प्रश्नावली 222 📝

प्रश्न १. ‘ मृत्युंजय ‘ या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण ?
उत्तर :-  शिवाजी सावंत

प्रश्न २. ‘ ययाती ‘ या कादंबरीचे लेखक कोण ?
उत्तर:- वि. स. खांडेकर

प्रश्न ३. ‘ फकीरा ‘ ही गाजलेली कादंबरी कोणाची ?
उत्तर :-  आण्णाभाऊ साठे

प्रश्न ४. राज्यशासनाचा पुरस्कार मिळालेली ‘ पांगिरा ‘ ह्या कादंबरीचे लेखक कोण ?
उत्तर :-  विश्वास महिपाती पाटील

प्रश्न  ५. गोलपिठा ‘ या कादंबरीचे लेखक हे ……..आहेत .
उत्तर :-   नामदेव ढसाळ

⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️

👉 आपल्या माहितीसाठी.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाण
          डॉ. आंबेडकरांची मुंबईतील महाप्रचंड अंत्ययात्रा (७ डिसेंबर १९५६). डॉ. आंबेडकरांची अंत्ययात्रा राजगृह (हिंदू कॉलनी), दादरवरून १.४० वाजता निघाली. दादर व्हिन्सेन्ट रोड (आताचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड), पोयबावडी, परळ, एलफिन्स्टन ब्रिज, सयाी रोड, गोखले रोड (उत्तर व दक्षिण), रानडे रोडवरून दादर चौपाटीवरील हिंदू स्मशानभूमीत (आता चैत्यभूमी) सायकांळी ६ वाजता पोहोचली. अंत्ययात्रेत देशभरातून १५ लाखांवर लोक दु:खित अंत:करणाने सामील झाले होते.

नागपूर व चंद्रपूर येथील धर्मांतराचे कार्यक्रम उरकून आणि आता धम्मचक्र पुन्हा एकदा गतिमान झालेले पाहून बाबासाहेब आंबेडकर दिल्लीला परतले. त्यानंतर काही आठवड्यात २० नोव्हेंबर १९५६ मध्ये ते नेपाळमधील काठमांडूला ‘वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्ट’च्या चौथ्या परिषदेस हजर राहले आणि आणि तेथिल प्रतिनिधींसमोर ‘बुद्ध की कार्ल मार्क्स’ या विषयावर भाषण केले. त्यात त्यांनी भगवान बुद्धाचा मार्ग मार्क्स पेक्षा कसा श्रेष्ठ आहे, ज्यात प्रेम, न्याय, बंधुत्व, विज्ञानवाद असून तो शोषण समाप्त करू शकतो असे सांगितले. आपल्या परतीच्या प्रवासात त्यांनी बनारसमध्ये दोन भाषणे दिली. दिल्लीमध्येही त्यांनी विविध बौद्ध समारंभात भाग घेतला, राज्यसभेच्या अधिवेशनात सहभागी झाले आणि आपल्या ‘भगवान बुद्ध आणि कार्ल मार्क्स’ या पुस्तकाचे शेवटचे प्रकरण लिहून पूर्ण केले. ५ डिसेंबरच्या सायंकाळी ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथाच्या प्रस्ताविक आणि परिचय या दोन प्रकरणांच्या प्रती आणून त्यांनी रात्री त्यांची तपासणी केली. दुसऱ्या दिवशी पहाटे १२.१५ वाजता ६ डिसेंबर इ.स. १९५६ रोजी दिल्लीला निवासस्थानी त्यांचे महापरिनिर्वाण (निधन) झाले. तेव्हा त्यांचे वय ६४ वर्ष आणि ७ महिन्याचे होते. दिल्लीहून विशेष विमानाने त्यांचे पार्थिव मुंबईला आणण्यात आले. मुंबई हे ठिकाण अत्यंविधीसीठी निश्चित झाले त्यानंतर देशभरातील त्यांचे अनुयायी मिळेल त्या साधनाने मुंबईला येऊ लागले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना बौद्ध बनून केवळ सातच आठवडे झाले होते, तरीसुद्धा त्या अल्पशा काळात बौद्ध धम्माच्या प्रचारासाठी सम्राट अशोकनंतर त्यांनी अन्य कोणाही भारतीयापेक्षा सर्वात अधिक कार्य केले होते.

डॉ. आंबेडकरांची अंत्ययात्रा राजगृह (हिंदू कॉलनी), दादरवरून १.४० वाजता निघाली. दादर व्हिन्सेन्ट रोड (आताचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड), पोयबावडी, परळ, एलफिन्स्टन ब्रिज, सयाी रोड, गोखले रोड (उत्तर व दक्षिण), रानडे रोडवरून दादर चौपाटीवरील हिंदू स्मशानभूमीत (आता चैत्यभूमी) सायकांळी ६ वाजता पोहोचली. अंत्ययात्रेत देशभरातून १५ लाखांवर लोक दु:खित अंत:करणाने सामील झाले होते. ७ डिसेंबर १९५६ रोजी सायंकाळी ७.५० वाजता त्यांच्यावर मुंबई मध्ये बौद्ध पद्धतींनी अंत्यसंस्कार करण्यात आले. मुंबई हे त्यांच्या जीवनकार्यातील अधिकांश काळ मुख्यालय होते आणि तेथेच त्यांचे अजूनही सर्वात जास्त अनुयायी होते. चार मैल लांबीच्या यात्रेत लाखो लोक सहभागी झाले होते आणि तिला दादरमधील ‘राजगृह’या डॉ. आंबेडकरांच्या निवास्थानापासून स्थानिक स्मशानभूमीपर्यंत पोहोचण्यास चार तास लागले. मुंबई शहराने पाहिलेली ती सर्वात मोठी अत्यंयात्रा होती. त्यानंतर दहनसंस्कारास उपस्थित राहिलेल्यापैंकी एक लाख लोक त्यांच्या अस्थींबरोबर तैनातीने राजगृहापर्यंत गेले. परंतु दहनभूमी सोडण्यापूर्वी त्यांनी बाबासाहेबांच्या इच्छेची पूर्ती करण्यासाठी म्हणून बौद्ध धम्माचा स्वीकार करण्याचा आग्रह धरला. त्यानुसार तत्क्षणी दीक्षा समारंभाचा कार्यक्रम होऊन तेथे उपस्थित असलेल्या बौद्ध भिक्खूंपैकी महापंडित डॉ. आनंद कौशल्यायन यांनी त्रिशरण व पंचशील देऊन त्याच ठिकाणी १० लाख लोकांना बौद्धधम्माची दीक्षा दिली.

Share This Article