ज्ञानाची वारी आली आपल्या दारी प्रश्नावली 223. Prashnavali 223

studykatta24.com
studykatta24.com - Teacher
7 Min Read

     📖 वाचाल तर वाचाल 📖

            📘आजचा परिपाठ📘


                        🇮🇳 राष्ट्रगीत 🇮🇳
                         🇮🇳 राज्यगीत 🇮🇳
                           🇮🇳प्रतिज्ञा🇮🇳
                     🇮🇳संविधान उद्देशिका🇮🇳

✒️✒️आज दिनांक :- ७ डिसेंबर  २०२४
🔊🔊 आजचा वार :- शनीवार

📙📘सुविचार :- शञूची व रोगाची उपेक्षा करु नये

📙📘📙 दिनविशेष

🌍🌍 आजचा जागतिक दिन



🎗️सशस्त्र सेना ध्वज दिन
🎗️आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिवस

✒️✒️ आजचा दिनविशेष – घटना

1825 : पहिले वाफेवर चालणारे जहाज एंटरप्राइझ भारतात आले.
1856 : पहिला उच्चवर्णीय विधवा विवाह कोलकाता येथे झाला.
1935 : अस्पृश्यतेच्या कारणावरचा प्रभातचा धर्मात्मा हा चित्रपट मुंबईतील कृष्णा सिनेमात प्रदर्शित झाला.
1994 :  आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिवस, आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटनेच्या (ICAO) स्थापनेच्या 50व्या वर्धापनदिनानिमित्त सुरू करण्यात आला.
1994 : कन्नड लेखक यू.आर. अनंतमूर्ती यांना ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
1998 : कवी वसंत बापट यांची 72 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली.


✒️✒️आजचा दिनविशेष – जन्म

1902 : ‘जनार्दन नवले’ – भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्म. (मृत्यू : 7 सप्टेंबर 1979)
1921 : ‘प्रमुख स्वामी महाराज’ – स्वामीनारायण पंथातील अध्यात्मिक गुरू यांचा जन्म. (मृत्यू : 13 ऑगस्ट 2016)
1933 : ‘शंकर’ – बंगाली लेखक यांचा जन्म.
1960 : ‘सुनील कांत मुंजाळ’ – भारतीय उद्योगपती यांचा जन्म.

✒️✒️ आजचा दिनविशेष – मृत्यू

1894 : ‘फर्डीनंट द लेशप्स’ – सुएझ कालव्याचे सहनिर्माते यांचे निधन. (जन्म : 19 नोव्हेंबर 1805)
1976 : ‘गोवर्धनदास पारेख’ – विचारवंत आणि शिक्षणतज्ज्ञ यांचे निधन.
1982 : ‘बाबूराव विजापुरे’ – संगीतशिक्षक यांचे निधन. (जन्म : 17 जून 1903)
1997 : ‘स्वामी शांतानंद सरस्वती’ – ज्योतिर्मठाचे शंकराचार्य यांचे अलाहाबाद येथील अलोपी आश्रमात निधन. (जन्म : 16 जुलै 1913 – अच्छाती, बस्ती, उत्तर प्रदेश)
2013 : ‘विनय आपटे’ – ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक यांचे निधन


🌍✒️  जागतिक दिन लेख :
        
                सशस्त्र सेना ध्वज दिन
            
             सशस्त्र सेना ध्वज दिन (Armed Forces Flag Day) दरवर्षी 7 डिसेंबर रोजी भारतात साजरा केला जातो. हा दिवस भारतीय सशस्त्र दलांच्या जवानांच्या त्याग, समर्पण, आणि साहसाचा सन्मान करण्यासाठी पाळला जातो. 1949 पासून हा दिवस साजरा केला जात आहे.या दिवशी सशस्त्र दलातील शहीद जवान, माजी सैनिक, आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी आर्थिक सहाय्य गोळा केले जाते. देशभरात लहान ध्वजांचे वितरण करून आणि योगदान गोळा करून देशाच्या रक्षणासाठी झटणाऱ्या जवानांच्या कार्याला मान्यता दिली जाते.
           शाळा, महाविद्यालये, आणि कार्यालयांमध्ये विविध कार्यक्रम, रॅली, आणि चर्चासत्रे आयोजित केली जातात. देशवासीयांना आपल्या सैन्य दलांबद्दल आदर व्यक्त करण्याची आणि त्यांच्या कल्याणासाठी योगदान देण्याची संधी मिळते.सशस्त्र सेना ध्वज दिन आपल्याला देशभक्ती आणि एकतेची भावना जागवतो. आपल्या जवानांच्या बलिदानाचे स्मरण करून त्यांचे ऋण फेडण्यासाठी आपण नेहमी तत्पर असायला हवे.

⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏭️⏭️⏮️⏮️⏭️⏮️
   
            🌍 भाषेवर प्रभुत्व मिळवुया 🌍

           📋 📖म्हणी व अर्थ📖 📋

👉 आईजीच्या जीवावर बाईजी उदार – दुसऱ्याचा पैसा खर्च करून औदार्य दाखविणे

            ✒️📖 वाक्प्रचार 📖✒️

👉  हात ओला होणे – फायदा होणे

     ✒️📖 शब्दसमुहाबद्दल एक शब्द 📖✒️

👉  ज्याला मरण नाही असा – अमर
⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️

                      🙏 प्रार्थना 🙏

                हीच अमुची प्रार्थना

हीच अमुची प्रार्थना अन् हेच अमुचे मागणे
माणसाने माणसाशी माणसासम वागणे

भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी,
सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खात्री,
तोवरी देई आम्हाला काजव्यांचे जागणे
माणसाने माणसाशी माणसासम वागणे

धर्म, जाती, प्रांत, भाषा, द्वेष सारे संपू दे
एक निष्ठा, एक आशा, एक रंगी रंगू दे
अन् पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे
माणसाने माणसाशी माणसासम वागणे

लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले
पाउले चालो पुढे.. जे थांबले ते संपले
घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लाभणे
माणसाने माणसाशी माणसासम वागणे
             


                   📝 बोधकथा 📝

               गाय आणि सिंह

           एका हिरव्यागार कुरणात तीन गाई रहात होत्या. काळी, पांढरी आणि भुरी अशी त्यांची नावे होती. त्यांच्या रंगावरून त्यांना ही नावे पडली होती. त्या एकमेकींशी खूप प्रेमाने वागायच्या व कायम एकत्रच रहायच्या.एके दिवशी एक महाभयंकर सिंह त्यांना खाण्यासाठी तिथे आला. परंतु त्या तिघी एकत्र रहात होत्या म्हणून तो त्यांना काहीच करू शकला नाही. सिंहाने विचार केला की, यांच्यात फूट पाडली तर आपले काम सहज होईल. शेवटी तो भुऱ्या गाईजवळ जाऊन म्हणाला, “मला तुझी फार आठवण येत होती, मला तुझ्या तब्येतीची फार काळजी वाटते.” भुरी गाय सिंहाच्या या बोलण्याला फसली आणि तिने त्याच्याशी मैत्री केली.
दुसऱ्या दिवशी सिंहाने भुऱ्या गाईला एकटीलाच बोलावले आणि तो म्हणाला, “तुझा रंग काळ्या गाईसारखा आहे, परंतु पांढरी गाय तुमच्या पेक्षा वेगळी आहे. आपण तिला मारून टाकू.” भुरी गाय त्याला हो म्हणाली आणि तिने काळ्या गाईला बोलण्यात गुंतवून ठेवले. तेवढ्या वेळात सिंहाने पांढऱ्या गाईला मारून टाकले. काही दिवसांनी असेच त्याने काळ्या गाईला सुद्धा मारले. नंतर सिंहाने भुऱ्या गाईला सुद्धा क्रूरपणे मारले व खाऊन टाकले. सिंहाने गाईंमध्ये फूट पाडून आपले काम साध्य केले होते.

बोध: आपल्या चांगल्या मित्रांना कधीही धोका देऊ नये.

                 📘 दिनांकानुसार पाढा :- ७ चा पाढा

                                 ७             ४२
                                 १४           ४९
                                 २१           ५६
                                 २८           ६३
                                 ३५           ७०

  ⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️ 

             📝 प्रश्नावली 223 📝

प्रश्न १. भारतात कोणत्या राज्याची किनारपट्टी सगळ्यात मोठी आहे ?
उत्तर :-  गुजरात.

प्रश्न २. जागतिक मानवी हक्क दिन कधी साजरा केला जातो ?
उत्तर :-  १० डिसेंबर.

प्रश्न ३. महाराष्ट्रातील सितफळासाठी प्रसिद्ध असणारे ठिकाण कोणते ?
उत्तर :-  दौलताबाद. (औरंगाबाद)

प्रश्न ४. आकाशात दिसणा-या इंद्रधनुष्यात हिरवा रंग कोठे असतो ?
उत्तर :- मध्यभागी.

प्रश्न ५. ‘बटाट्याची चाळ’ हे पुस्तक कोणत्या लेखकाचे आहे ?
उत्तर :-  पु.ल.देशपांडे

⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️

👉आपल्या माहितीसाठी.

✡ *महाराष्ट्राचे 21 वे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस* ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
दिनांक 5 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी 5:30 वाजता  महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

◾️विधानसभा 2024 = 15 वी 
◾️राज्यपाल=सीपी राधाकृष्णन  24 वे
◾️महाराष्ट्र विधानसभा जागा=288 जागा
◾️महाराष्ट्र विधानपरिषद जागा=78जागा
◾️महाराष्ट्र लोकसभा जागा= 48 जाग
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🛑 *लक्षात ठेवा* 🛑
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
✅ *महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री* ?
🟰शरद पवार (38 वर्षे)
✅ *महाराष्ट्राचे सर्वात जास्त काळ राहिलेले मुख्यमंत्री?*
🟰वसंतराव नाईक ( 11 वर्षे 78 दिवस)
✅ *महाराष्ट्राचे सर्वात कमी काळ राहिलेले मुख्यमंत्री?*
🟰देवेंद्र फडणवीस (5 दिवस)
✅ *महाराष्ट्राचे सर्वाधिक वेळा मुख्यमंत्री ?*
🟰शरद पवार ( 4 वेळा)
✅ *महाराष्ट्राचे सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री?*
🟰 अजित पवार ( 6वेळ )

Share This Article