📖 वाचाल तर वाचाल 📖
📘आजचा परिपाठ📘
🇮🇳 राष्ट्रगीत 🇮🇳
🇮🇳 राज्यगीत 🇮🇳
🇮🇳प्रतिज्ञा🇮🇳
🇮🇳संविधान उद्देशिका🇮🇳
✒️✒️आज दिनांक :- ९ डिसेंबर २०२४
🔊🔊 आजचा वार :- सोमवार
📙📘सुविचार :- समस्या तुम्हाला कमकुवत नाही तर मजबूत बनवायला येतात.
📙📘📙 दिनविशेष
🌍🌍 आजचा जागतिक दिन
⚡⚡ आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन
🖊️🖊️आजचा दिनविशेष – घटना
1753 : थोरले माधवराव पेशव्यांनी रमाबाईशी लग्न केले
1892 : इंग्लिश फुटबॉल क्लब न्यूकॅसल युनायटेडची स्थापना झाली
1900 : स्वामी विवेकानंद अमेरिकेतील सर्व धर्म परिषदेत भाग घेऊन मुंबईत भारतात परतले.
1900 : डेव्हिस कप टेनिस स्पर्धा सुरू झाली.
1946 : संविधान सभेची पहिली बैठक दिल्लीत झाली.
1961 : दीव आणि दमण हे पोर्तुगीजांच्या ताब्यातील प्रदेश भारतात समाविष्ट करण्यात आले.
1961 : टांझानियाला ब्रिटनपासून स्वातंत्र्य मिळाले.
1966 : बार्बाडोस संयुक्त राष्ट्र संघात सामील झाला.
1971 : संयुक्त अरब अमिराती संयुक्त राष्ट्रांमध्ये सामील झाली.
1975 : बारामती-पुणे थेट रेल्वेचे उद्घाटन झाले.
1992 : ऑपरेशन रिस्टोर होपसाठी अमेरिकन सैन्य सोमालियात दाखल झाले.
🖊️🖊️ आजचा दिनविशेष – जन्म
1825 : ‘राव तुलाराम सिंह’ – 1857 मध्ये झालेल्या पहिल्या भारतीय स्वातंत्र्ययुद्धातील प्रमुख नेत्यांपैकी एक, यांचा जन्म.
1878 : ‘अण्णासाहेब लठ्ठे’ – कोल्हापूर संस्थानचे दिवाण व शिक्षणमंत्री यांचा जन्म. (मृत्यू : 16 मे 1950)
1919 : ‘ई. के. नयनार’ – केरळचे मुख्यमंत्री यांचा जन्म.
1945 : ‘शत्रुघ्न सिन्हा’ – चित्रपट अभिनेते आणि खासदार यांचा जन्म.
1946 : ‘सोनिया गांधी’ – जन्माने इटालियन असलेल्या भारतीय राजकारणी यांचा जन्म.
1980 : ‘पूनम महाजन’ – भारतीय राजकारणी यांचा जन्म.
1981 : ‘प्रणिती शिंदे’ – भारतीय राजकारणी यांचा जन्म.
1981 : ‘दिया मिर्झा’ – अभिनेत्री यांचा जन्म.
🖊️🖊️ आजचा दिनविशेष – मृत्यू
1761 : ‘छत्रपती महाराणी ताराबाई भोसले’ – छत्रपती राजाराम महाराज यांच्या पत्नी यांचे निधन.
1942 : ‘डॉ. द्वारकानाथ कोटणीस’ – हिंदी-चीनी मैत्रीचे प्रतिक यांचे निधन. (जन्म : 10 ऑक्टोबर 1910)
1993 : ‘स्नेहप्रभा प्रधान’ – चित्रपट अभिनेत्री यांचे निधन.
1997 : ‘के. शिवराम कारंथ’ – कन्नड लेखक, चित्रपट निर्माते आणि विचारवंत तसेच ज्ञानपीठ पारितोषिक विजेते, पद्मभूषण आणि साहित्य अकादमी अवॉर्ड विजेते यांचे निधन.
🖊️🖊️ जागतिक दिन लेख
आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन
आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस (International Anti-Corruption Day) दरवर्षी 9 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. याचा उद्देश भ्रष्टाचाराच्या दुष्परिणामांबद्दल जागृती निर्माण करणे आणि त्याविरुद्ध लढण्यासाठी जनतेला प्रोत्साहित करणे हा आहे.
भ्रष्टाचार हा समाजाच्या प्रगतीसाठी मोठा अडथळा आहे. तो केवळ आर्थिक हानी करत नाही, तर लोकांच्या विश्वासाला तडा देतो, आणि सामाजिक विषमता वाढवतो. या समस्येमुळे शिक्षण, आरोग्य, आणि रोजगाराच्या संधींवर नकारात्मक परिणाम होतो.संयुक्त राष्ट्रसंघाच्या पुढाकाराने हा दिवस साजरा केला जातो. विविध देशांमध्ये भ्रष्टाचार निर्मूलनासाठी कायदे, मोहिमा, आणि जनजागृती कार्यक्रम राबवले जातात. लोकशाही, पारदर्शकता, आणि जबाबदारी या मूल्यांची जपणूक करण्यासाठी भ्रष्टाचारविरोधी चळवळीला बळ दिले जाते.
आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस प्रत्येकाला जागरूक राहण्याचा आणि स्वच्छ व पारदर्शक समाज घडवण्यासाठी योगदान देण्याचा संदेश देतो. प्रामाणिकपणा, नीतिमत्ता, आणि कायद्याचे पालन यामुळे भ्रष्टाचारमुक्त समाजाची उभारणी शक्य आहे.
⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏭️⏭️⏮️⏮️⏭️⏮️⏭️⏪⏭️⏪⏭️⏪⏭️⏪⏪⏭️
🌍 भाषेवर प्रभुत्व मिळवुया 🌍
📋 📖म्हणी व अर्थ📖 📋
👉 ओळखीचा चोर जीवे न सोडी – ओळखीचा शत्रू हा अनोळखी शत्रूपेक्षा भयंकर असतो .
✒️📖 वाक्प्रचार 📖✒️
👉 कपाळाला हात लावणे – हताश होणे,निराश होणे
✒️📖 शब्दसमुहाबद्दल एक शब्द 📖✒️
👉 कोणतीही तक्रार न करणारा – विनातक्रार
⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏭️⏮️⏭️⏮️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️
🙏 प्रार्थना 🙏
शुभंकरोती कल्याणम
दिवा पाहूनी लक्ष्मी येते, करु तिची प्रार्थना,
शुभंकरोती म्हणा मुलांनो, शुभंकरोती म्हणा ॥धृ॥ शुभंकरोती कल्याणमं, शुभंकरोती कल्याणमं,
जेथे ज्योती, तेथे लक्ष्मी, उभी जगाच्या सेवाधर्मी दिशांदिशांतून या लक्ष्मीच्या, दिसती पाऊल खुणा ॥१॥
या ज्योतीने सरे आपदा, आरोग्यासह मिळे संपदा शत्रुबुद्धिचा विनाश होता, सौख्य मिळे जीवना ॥२॥
दिव्या दिव्या रे दिपत्कार, कानी कुंडल मोतीहार दिव्यास पाहून नमस्कार हा, रिवाज आहे जुना ॥३॥
शुभंकरोती म्हणा मुलांनो, शुभंकरोती म्हणा
📝 बोधकथा 📝
म्हातारी व वैद्य
एका म्हातारीच्या डोळ्यांत ‘फुले’ पडल्याने तिला बरेच कमी दिसू लागले. तिने आपले डोळे गावातल्या एका नामवंत वैद्याला दाखविले व त्याचे औषध सुरू केले. तो वैद्य दररोज तिच्या घरी येई, तिच्या दोन्ही डोळ्यांत औषध घाली आणि तिच्या डोळ्यांना पट्टी बांधी. पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी येई, आदल्या दिवशीची पट्टी सोडून व नव्याने औषध घालून तो तिच्या डोळ्यांना नवी पट्टी बांधी. तिचे डोळे सदैव बांधलेले असल्याने, तो तिच्याकडून जाताना तिच्या घरातल्या एक-दोन वस्तू चोरून नेई. दोन महिन्यांनी जेव्हा तिला चांगले दिसू लागले व तिच्या डोळ्यांवरील पट्टी कायमची काढण्यात आली. तेव्हा तिला आपल्या घरातल्या सर्व वस्तू वैद्याने लांबविल्या असल्याचे आढळून आले. तिने त्याबद्दल त्या वैद्याला एका शब्दानेही विचारले नाही. फक्त औषधोपचाराचे पैसे देण्याचे नाकारले. यावर त्या पैशांच्या वसुलीसाठी, वैद्याने त्या म्हातारीविरुद्ध न्यायालयात दावा दाखल केला.
वैद्याला औषधाचे पैसे न देण्याचे कारण न्यायमूर्तीनी त्या म्हातारीला विचारता ती म्हणाली, “महाराज, या वैद्याचे औषध सुरू करण्यापूर्वी माझ्या डोळ्यांना जरी बरेच कमी दिसत होते, तरी अंधुक अंधुक का होईना, घरातल्या सर्व वस्तू दिसत होत्या व चाचपडल्या असता हातांना लागत होत्या. परंतु डोळ्यांवरचे या वैद्याचे औषधोपचार पूर्ण झाल्यापासून मला घरातली एकही वस्तू दिसत नाही किंवा हातांना लागत नाही.” त्या म्हातारीच्या बोलण्यामागे दडलेला अर्थ न्यायमूर्तीना समजला. त्यांनी त्या वैद्याच्या घरावर शिपायांची धाड घालून, त्याच्या घरात दडवलेल्या म्हातारीच्या सर्व वस्तू तिला परत करण्याचा व त्यांच्या चोरीच्या अपराधाबद्दल शिक्षा म्हणून त्याला औषधापोटी म्हातारीने एक पैसाही न देण्याचा हुकूम फर्मावला. वैद्याची चोरी उघडकीस आली, चोरलेल्या सर्व चीजवस्तूही गेल्या आणि त्याबरोबरच चोरी केल्यामुळे अब्रूही गेली.
तात्पर्य : अति लोभ संकटाना निमंत्रण देतो.
📘 दिनांकानुसार पाढा :- ९ चा पाढा
९ ५४
१८ ६३
२७ ७२
३६ ८१
४५ ९०
⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️
📝प्रश्नावली २२३📝
प्रश्न १. व्ही.शांताराम पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे ?
उत्तर :- कलाक्षेत्र.
प्रश्न २. सर्वात हलका धातू कोणता आहे ?
उत्तर :- लिथियम.
प्रश्न ३. सूर्यमालेतील सर्वांत मोठा ग्रह कोणता आहे ?
उत्तर :- गुरू.
प्रश्न ४.आरती प्रभू हे कोणाचा टोपणनाव आहे ?
उत्तर :- चिंतामण त्र्यंबक खानोलकर.
०५) जुगलबंदी या पुस्तकाचे लेखक कोण आहे ?
उत्तर :- शंकर पाटील
⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏮️⏭️⏮️⏮️⏭️⏮️
👉 आपल्या माहितीसाठी.
💘 भारताची लोकसंख्या 2011
⭐️एकूण लोकसंख्या : 121 कोटी. (51.5%
⭐️पुरुष, 48.5% स्त्रिया)
⭐️ग्रामीण लोकसंख्या : 68.8%
⭐️शहरी लोकसंख्या : 31.2%
⭐️दशवार्षिक वृद्धीदर : 17.72%
⭐️दशवार्षिक वाढ : 18.22कोटी
⭐️घनता : 382
⭐️लिंग गुणोत्तर : 943
⭐️लिंग गुणोत्तर (0-6 वर्ष) : 918
⭐️साक्षरता : 72.98%
.
💘 2011 नुसार महाराष्ट्र लोकसंख्या
⭐️एकूण लोकसंख्या 112,374,333
⭐️पुरुष लोकसंख्या 58243056
⭐️महिला लोकसंख्या 54131277
⭐️भारताच्या 9.28% लोकसंख्या
⭐️महाराष्ट्राच्या लोकसंख्येची दशकातील वाढ
15.99%
◾️महाराष्ट्रातील शहरी लोकसंख्येचे प्रमाण
45.23%
महाराष्ट्रातील ग्रामीण लोकसंख्येचे प्रमाण
54.78%
◾️बाल लिंग गुणोत्तर – 694
◾️साक्षरता – साक्षरता 82.34%
◾️स्त्री साक्षरता – 75.87%
◾️पुरुष साक्षरता – 75.87%