“ज्ञानाची वारी , आली आपल्या दारी.”प्रश्नावली 225. Prashnavali 225.

studykatta24.com
studykatta24.com - Teacher
9 Min Read

              📖 वाचाल तर वाचाल 📖

                         📘 आजचा परिपाठ 📘


                        🇮🇳 राष्ट्रगीत 🇮🇳
                         🇮🇳 राज्यगीत 🇮🇳
                           🇮🇳प्रतिज्ञा🇮🇳
                     🇮🇳संविधान उद्देशिका🇮🇳

✒️✒️आज दिनांक :- १० डिसेंबर  २०२४
🔊🔊 आजचा वार :- मंगळवार

📙📘सुविचार :- महान विचार, सकारात्मक भावना आणि स्वीकारार्ह आचरण हे जीवनाचे खरे विपुलता आहे.

📙📘📙 दिनविशेष

🌍🌍 आजचा जागतिक दिन


🎌 मानवी हक्क दिन

🖊️🖊️ आजचा दिनविशेष – घटना

1868 : लंडनच्या वेस्टमिन्स्टर पॅलेसमध्ये पहिले ट्रॅफिक सिग्नल बसवण्यात आले.
1901 : आल्फ्रेड नोबेल यांच्या मृत्यूच्या पाच वर्षा नंतर स्टॉकहोममध्ये पहिला नोबेल पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला.
1906 : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष थिओडोर रुझवेल्ट यांना नोबेल शांति पुरस्कार देण्यात आला. नोबेल पारितोषिक मिळवणारे ते पहिले अमेरिकन होत.
1916 : संगीत स्वयंवर या संगीत नाटकाचा पहिला प्रयोग झाला.
1932 : थायलंड एक घटनात्मक राजेशाही बनले.
1948 : मानवी हक्क दिन, मानवाधिकार करारावर संयुक्त राष्ट्रांनी स्वाक्षरी केली.
1953 : ब्रिटिश पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांना साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळाले.
1996 : नेल्सन मंडेला यांनी दक्षिण आफ्रिकेची नवीन राज्यघटना जारी केली.
1998 : अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक अर्थशास्त्रज्ञ प्रो. अमर्त्य सेन यांना देण्यात आले.
2003 : भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने कसोटी क्रिकेटमधील 35 वे शतक झळकावले.
2014 : भारताचे कैलाश सत्यार्थी आणि पाकिस्तानची मलाला युसुफझाई यांना संयुक्तपणे शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला.

🖊️🖊️ आजचा दिनविशेष – जन्म

1870 : ‘सर जदुनाथ सरकार’ – इतिहासकार यांचा जन्म. (मृत्यू : 19 मे 1958)
1878 : ‘चक्रवर्ती राजगोपालचारी’ – स्वतंत्र पक्षाचे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 25 डिसेंबर 1972)
1880 : ‘श्रीपाद कृष्ण बेलवलकर’ – प्राच्यविद्यापंडित यांचा जन्म. (मृत्यू : 8 जानेवारी 1967 – पुणे)
1908 : ‘हसमुख धीरजलाल’ – सांकलिया भारतीय पुरातत्वावेत्ते यांचा जन्म.
1957 : ‘प्रेमा रावत’ – भारतीय-अमेरिकन गुरू आणि शिक्षक यांचा जन्म.

🖊️🖊️ आजचा दिनविशेष – मृत्यू

1857 : ‘वीर नारायण सिंह’ – छत्तीसगड राज्याचे पहिले स्वातंत्र्यसैनिक, 10 डिसेंबर 1857 रोजी त्यांना रायपूरच्या जयस्तंभ चौकात फाशी देण्यात आली.
1896 : ‘अल्फ्रेड नोबेल’ – स्वीडीश संशोधक आणि नोबेल पुरस्कारांचे प्रणेते यांचे निधन. (जन्म : 21 ऑक्टोबर 1833)
1920 : ‘होरॅस डॉज’ – डॉज मोटर कंपनी चे एक संस्थापक यांचे निधन. (जन्म : 17 मे 1868)
1953 : ‘अब्दुल्ला यूसुफ अली’ – भारतीय-इंग्रजी विद्वान आणि अनुवादक यांचे निधन. (जन्म : 14 एप्रिल 1872)
1955 : ‘आचार्य शंकर दत्तात्रेय जावडेकर’ – प्रज्ञावंत भाष्यकार आणि गांधीवादी तत्वचिंतक यांचे निधन. (जन्म : 26 सप्टेंबर 1894)
1963 : ‘सरदार के. एम. पणीक्कर’ – इतिहास पंडित यांचे निधन. (जन्म : 3 जून 1895)
1964 : ‘शंकर गणेश दाते’ – ग्रंथसूचीकार यांचे निधन. (जन्म : 17 ऑगस्ट 1905)
2001 : ‘अशोक कुमार गांगुली’ – चित्रपट अभिनेते यांचे निधन. (जन्म : 13 ऑक्टोबर 1911)
2003 : ‘श्रीकांत ठाकरे’ – संगीतकार यांचे निधन.
2009 : ‘दिलीप पुरुषोत्तम चित्रे’ – लेखक आणि कवी यांचे निधन. (जन्म : 17 सप्टेंबर 1938)

🌍 जागतिक दिन लेख

                   मानवी हक्क दिन

           मानव हक्क दिन (Human Rights Day) दरवर्षी 10 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. 1948 साली संयुक्त राष्ट्रसंघाने मानवाधिकारांची सार्वत्रिक जाहीरनामा (Universal Declaration of Human Rights) स्वीकारला, त्या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो.मानव हक्क प्रत्येक व्यक्तीला जन्मतःच मिळालेला अधिकार आहे, जो धर्म, जात, लिंग, भाषा किंवा राष्ट्रीयतेच्या आधारावर बदलत नाही. या अधिकारांमध्ये स्वातंत्र्य, समानता, शिक्षण, न्याय, आणि मानवी प्रतिष्ठा यांचा समावेश होतो.
            मानव हक्क दिनाचा उद्देश जागतिक पातळीवर मानवाधिकारांचे संरक्षण आणि प्रोत्साहन देणे हा आहे. विविध देशांमध्ये या दिवशी शैक्षणिक कार्यक्रम, चर्चासत्रे, आणि जनजागृती मोहिमा आयोजित केल्या जातात.मानव हक्क दिन आपल्याला मानवतेसाठी एकत्र येण्याची आणि प्रत्येकासाठी समतापूर्ण, न्याय्य, आणि सन्मानाने जगणारी व्यवस्था निर्माण करण्याची प्रेरणा देतो. आपल्या कृतीतून मानवाधिकारांचा सन्मान आणि रक्षण करणे हीच खरी आदरांजली आहे.

⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏭️⏭️⏮️⏮️⏭️⏮️
   
            🌍 भाषेवर प्रभुत्व मिळवुया 🌍

           📋 📖म्हणी व अर्थ📖 📋

👉 एक ना धड भाराभर चिंध्या – एकाच वेळी अनेक कामे करायला घेतल्याने सर्वच कामे अर्धवट होण्याची अवस्था .


            ✒️📖 वाक्प्रचार 📖✒️

👉  प्रश्नांची सरबत्ती करणे – एकसारखे प्रश्न विचारणे .

     ✒️📖 शब्दसमुहाबद्दल एक शब्द 📖✒️

👉  दगडासारखे हृदय असणारा – पाषाणहृदयी



⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️

                      🙏 प्रार्थना 🙏

                खरा तो एकचि धर्म

खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे ॥ धृ.॥

जगी जे हीन अति पतित, जगी जे दीन पद दलित तया जाऊन उठवावे, जगाला प्रेम अर्पावे ||धृ.।।

सदा जे आर्त अति विकल, जयांना गांजती सकल तया जाऊन हसवावे, जगाला प्रेम अर्पावे ||१||

कुणा ना व्यर्थ शिणवावे, कुणा ना व्यर्थ हिणवावे समस्तां बंधु मानावे, जगाला प्रेम अर्पावे ॥२॥

प्रभूची लेकरे सारी तयाला सर्व ही प्यारी कुणा ना तुच्छ लेखावे, जगाला प्रेम अर्पावे ॥३॥

असे हे सार धर्माचे असे हे सार सत्याचे परार्थी प्राण ही द्यावे, जगाला प्रेम अर्पावे ॥४॥

                   📝 बोधकथा 📝

              गोष्ट दोन मित्रांची… अपमान व उपकार

एकदा दोन मित्र वाळवंटातून चाललेले असतात, रस्त्यात त्यांच्यात काहीतरी बाचाबाची होते आणि बाचाबाचीचे रुपांतर भांडणात होते. इतके कडाक्याचे भांडण होते कि एक मित्र दसऱ्या मित्राच्या थोबाडीत ठेवून देतो. ज्याला थोबाडीत बसते तो दुसरा मित्र खूप दुःखी होतो, गप्प बसतो आणि वाळूमध्ये बोटाने लिहितो,” आज माझ्या प्राणप्रिय मित्राने मला थोबाडीत दिली, ज्याला मी जीवापाड मैत्री करतो त्याने मला आज मारले.” ज्याने थोबाडीत मारलेली असते तो हे पाहतो पण काहीच न बोलता दोघेही पुढे चालत राहतात.

पुढे गेल्यावर त्यांना एक तलाव दिसतो, दोघेही जण पाण्यात उतरून स्नान करायचे ठरवतात, अंघोळ करता करता थोबाडीत खाल्लेला मित्र अचानक पाण्यात घसरतो, तिथे नेमकी दलदल असते, तो जोरजोराने ओरडायला सुरुवात करतो. ज्याने थोबाडीत मारलेली असते तो मित्र क्षणाचाही विचार न करता आपल्या मित्राच्या सहाय्याला धावतो आणि त्याला त्या दलदलीतून बाहेर ओढून काढतो. जेंव्हा तो बुडणारा मित्र पाण्याबाहेर येतो, अंग कोरडे करतो तेंव्हा तो एका दगडाने दगडावर कोरून लिहितो, “आज माझ्या प्राणप्रिय मित्राने मला मरणाच्या दारातून ओढून परत आणले, मी आज मेलोच असतो पण त्याने स्वतःचा जीव धोक्यात घालून मला वाचविले.” हे पण तो थोबाडीत देणारा वाचतो आणि त्याला राहवत नाही तो त्या मित्राला विचारतो कि, “पहिले मी तुला मारले तर ते तू वाळूत लिहिले आणि आता तुला पाण्यातून वाचविले तर ते तू दगडावर कोरून लिहिले हे असे का?”

लिहिणारा मित्र म्हणाला, ” जेंव्हा कोणी आपल्या हृदयाला, मनाला, भावनेला ठेच लावेल तेंव्हा ते सर्व काही वाळूत लिहावे कारण काही काळानंतर वाळू हि विस्कळीत होऊन जाते आणि मनातील भावनाही फार काळ एकसारख्या राहत नाहीत. पण जर कुणी उपकार केले तर ते मात्र दगडावर कोरून लिहिले कारण दगडावर कोरलेले जसे कायमस्वरूपी टिकून राहते तसे उपकार हे कायम लक्षात ठेवले जावेत.

” तात्पर्य : “माणसाने अपमान तत्काळ विसरून जावा आणि उपकार आजन्म लक्षात ठेवावे.

            📘 दिनांकानुसार पाढा :- १० चा पाढा

                            १०            ६०
                            २०            ७०
                            ३०            ८०
                            ४०            ९०
                            ५०            १००

  ⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️  ⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️

                   📝 प्रश्र्नावली २२५ 📝

प्रश्न १. विशाखापट्टणम हे बंदर कोणत्या राज्यात आहे ?
उत्तर :- आंध्र प्रदेश

प्रश्न २. महाराष्ट्र राज्याचे लोकनृत्य कोणते ?
उत्तर :- लावणी

प्रश्न ३. झारखंड राज्याची राजधानी कोणती आहे ?
उत्तर :- रांची

प्रश्न ४. मंडलीच्या तुरुंगात असताना लोकमान्य टिळक यांनी कोणता ग्रंथ लिहिला होता ?
उत्तर :- गीतारहस्य .

प्रश्न ५. “बहुजन हिताय,बहुजन सुखाय” ही शिकवण कोणी दिली ?
उत्तर :-  गौतम बुद्ध.

⏩⏪⏩⏪⏩⏪⏩⏪⏩⏪⏩⏪⏩⏪⏩⏪⏩⏪⏩⏪⏩⏩⏪⏩⏪⏩

👉आपल्या माहितीसाठी .

🌐भारतातील शिक्षण विषयक आयोग व समित्या

▪️वुडचा अहवाल : 1854
▪️हंटर आयोग : 1882-83
▪️थॉमस रॅले आयोग : 1902
▪️भारतीय विद्यापीठ कायदा : 1904
▪️सॅडलर आयोग : 1917-19
▪️हार्टोग समिती : 1929
▪️सार्जंट योजना : 1944
▪️राधाकृष्णन आयोग : 1948-49
▪️मुदलियार आयोग : 1952
▪️दुर्गाबाई देशमुख आयोग : 1958
▪️हंसा मेहता समिती : 1961-62
▪️कोठारी आयोग : 1964-66
▪️राष्ट्रीय शैक्षणिक धोरण : 1968
▪️राष्ट्रीय शैक्षणिक धोरण : 1986
▪️सर्व शिक्षा अभियान : 2001

Share This Article