📖 वाचाल तर वाचाल 📖
📘 आजचा परिपाठ 📘
🇮🇳 राष्ट्रगीत 🇮🇳
🇮🇳 राज्यगीत 🇮🇳
🇮🇳प्रतिज्ञा🇮🇳
🇮🇳संविधान उद्देशिका🇮🇳
✒️✒️आज दिनांक :- १७ डिसेंबर २०२४
🔊🔊 आजचा वार :- मंगळवार
📙📘सुविचार :- आत्मविश्वास ही यशाची पहिली पायरी आहे.
📙📘📙 दिनविशेष
🌍जागतिक दिवस
⚡ राष्ट्रीय निवृत्तिवेतनधारक दिवस
🖊️🖊️ आजचा दिनविशेष – घटना
1927 : हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनचे क्रांतिकारक राजेंद्र नाथ लाहिरी यांना ब्रिटीश सरकारने निर्धारित तारखेच्या दोन दिवस आधी गोंडा तुरुंगात फाशी दिली.
1928 : पोलिसांच्या हातून लाला लजपत राय यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांनी ब्रिटिश पोलिस ऑफिसर जेम्स साँडर्स याची लाहोर येथे हत्या केली, त्यानंतर तिघांना 1931 मध्ये फाशी देण्यात आली.
1970 : जयंतीलाल छोटालाल शहा यांनी भारताचे 13 वे सरन्यायाधीश म्हणुन पदभार स्वीकारला.
2014 : युनायटेड स्टेट्स आणि क्युबा यांनी राजनैतिक संबंध पुन्हा प्रस्थापित केले.
2016 : शरद पवार यांनी एमसीए (मुंबई क्रिकेट असोसिएशन) च्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
2016 : लेफ्टनंट जनरल बिपिन रावत यांची लष्कर प्रमुख आणि एअर चीफ मार्शल बी.एस. धनोआ यांची हवाई दल प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली.
2016 : आयपीएस ए. के. धस्माना यांची रॉ च्या प्रमुखपदी तर राजीव जैन यांची आयबी च्या प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली.
🖊️🖊️ आजचा दिनविशेष – जन्म
1778 : ‘सर हंफ्रे डेव्ही’ – विद्युत पृथक्करणाद्वारे सोडिअम आणि पोटॅशिअम ही मूलद्रव्ये प्रथमच वेगळी करणारे इंग्लिश भौतिक व रसायनशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 29 मे 1829)
1849 : ‘लालमोहन घोष’ – देशभक्त, काँग्रेसचे 16 वे अध्यक्ष यांचा कलकत्ता येथे जन्म. (मृत्यू : 18 ऑक्टोबर 1909)
1900 : ‘मेरी कार्टराइट’ – इंग्लिश गणितज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 3 एप्रिल 1998)
1901 : ‘यशवंत गोपाळ जोशी’ – मराठी लघुकथाकार व प्रसाद मासिकाचे संपादक यांचा जन्म. (मृत्यू : 7 नोव्हेंबर 1963)
1905 : ‘मुहम्मद हिदायतुल्लाह’ – भारताचे सहावे उपराष्ट्रपती आणि अकरावे सरन्यायाधीश यांचा जन्म. (मृत्यू : 18 सप्टेंबर 1992)
1911 : ‘डी. डी. रेगे’ – चित्रकार व लेखक यांचा जन्म. (मृत्यू : 2 सप्टेंबर 1999)
1934 : ‘गोपालन कस्तुरी’ – पत्रकार, द हिन्दू चे संपादक यांचा जन्म. (मृत्यू : 21 सप्टेंबर 2012)
1947 : ‘दीपक हळदणकर’ – दिग्दर्शक व चलचित्रकार यांचा जन्म.
1972 : ‘जॉन अब्राहम’ – अभिनेते यांचा जन्म.
1978 : ‘रितेश देशमुख’ – अभिनेते यांचा जन्म.
🖊️🖊️ आजचा दिनविशेष – मृत्यू
1740 : ‘सेनापती चिमाजी अप्पा’ – पेशवाईतील पराक्रमी यांचे निधन.
1907 : ‘लॉर्ड केल्व्हिन’ – इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ व गणितज्ञ यांचे निधन. (जन्म : 26 जून 1824)
1933 : ‘थुब्तेन ग्यात्सो’ – 13 वे दलाई लामा यांचे निधन. (जन्म : 12 फेब्रुवारी 1876)
1938 : ‘चारुचंद्र बंदोपाध्याय’ – बंगाली कथालेखक व कादंबरीकार यांचे निधन. (जन्म : 11 ऑक्टोबर 1876 – चांचल, माल्डा, बांगला देश)
1956 : ‘पं. शंकरराव व्यास’ – गायक व संगीतशिक्षक यांचे निधन. (जन्म : 23 जानेवारी 1898)
1959 : ‘डॉ. भोगराजू पट्टाभी सीतारामय्या’ – स्वातंत्र्यसैनिक, इतिहासकार आणि काँग्रेसचे नेते यांचे निधन. (जन्म : 24 डिसेंबर 1880)
1965 : ‘जनरल कोडेन्डेरा सुबय्या थिमय्या’ – भारतीय भूदलाचे 6 वे सरसेनापती यांचे निधन. (जन्म : 30 ऑगस्ट 1906)
1985 : ‘मधुसूदन कालेलकर’ – नाटककार, कथाकार आणि पटकथाकार यांचे निधन. (जन्म : 22 मार्च 1924)
2000 : ‘जाल पारडीवाला’ – अॅथलॅटिक्सचे पितामह आणि नामवंत प्रशिक्षक यांचे निधन.
2001 : ‘देवदत्त दाभोळकर’ – पुणे विद्यापीठाचे कुलगुरू यांचे निधन. (जन्म : 23 सप्टेंबर 1919)
🖊️🌍 जागतिक दिन लेख
राष्ट्रीय निवृत्तिवेतनधारक दिवस
राष्ट्रीय निवृत्तिवेतनधारक दिवस दरवर्षी 17 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. हा दिवस निवृत्तिवेतनधारकांच्या कष्टांचे कौतुक करण्यासाठी आणि त्यांचे जीवन सुलभ करण्यासाठी समर्पित आहे. निवृत्तिवेतन ही निवृत्त व्यक्तींच्या आर्थिक स्थैर्याची हमी आहे, ज्यामुळे त्यांना निवृत्तीनंतरही सन्मानाने जीवन जगता येते.सरकारने निवृत्तिवेतन योजना राबवून अनेक कर्मचाऱ्यांसाठी आर्थिक सुरक्षितता सुनिश्चित केली आहे. हा दिवस निवृत्त व्यक्तींनी दिलेल्या सेवांचा सन्मान करण्यासाठी आणि त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी उपाययोजना करण्याची संधी प्रदान करतो.
निवृत्तिवेतनधारकांसाठी सवलती, आरोग्य सेवा, आणि सामाजिक लाभांच्या योजनांचे महत्त्व वाढले आहे. त्यांचे अनुभव आणि ज्ञान हे समाजासाठी मोठा ठेवा आहेत, ज्याचा उपयोग नवीन पिढ्यांना मार्गदर्शनासाठी होतो.राष्ट्रीय निवृत्तिवेतनधारक दिवस आपल्याला त्यांच्या सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची आणि त्यांच्या सुखकर निवृत्तीचे महत्त्व समजण्याची प्रेरणा देतो. त्यांचा आदर आणि कल्याण हे आपले कर्तव्य आहे.
⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏭️⏭️⏮️
🌍 भाषेवर प्रभुत्व मिळवुया 🌍
📋 📖म्हणी व अर्थ📖 📋
👉 आपल्याच पोळीवर तूप ओढणे – फक्त स्वत:चाच तेवढा फायदा साधून घेणे .
✒️📖 वाक्प्रचार 📖✒️
👉 कागदी घोडे नाचवणे – फक्त लेखनात शूरपणा दाखवणे
✒️📖 शब्दसमुहाबद्दल एक शब्द 📖✒️
👉 चार रस्ते एकत्र मिळालेले ठिकाण – चौक
⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️
🙏 प्रार्थना 🙏
अजाण आम्ही तुझी लेकरे
अजाण आम्ही तुझी लेकरे, तू सर्वांचा पिता
नेमाने तुझ नमितो, गतो तुझ्या गुणांच्या कथा ॥धृ॥
सूर्य चंद्र हे तुझेच देवा, तुझी गुरे वासरे
तुझीच शेते सागर, डोंगर फळे फुले पाखरे ॥१॥
अनेक नावे तुला, तुझे रे दहा दिशांना घर
करिसी देवा सारखीच तू माया, सगळ्यावर ॥२॥
खूप शिकावे, काम करावे, प्रेम धरावे मनी
हौस एवढी पुरवी देवा, हिच एक मागणी ॥३॥
📝 बोधकथा 📝
सद्गुणांची ओळख
इसाप हा एक गुलाम होता, पण आपल्या विद्वत्तेच्या जोरावर त्याने समाजात अत्युच्च स्थान निर्माण केले होते, ज्या धनाढ्याने इसापला विकत घेतले होते त्याचे नाव होते क्झेनथस, इसाप आपल्या आचरणातून क्झेनथसला सतत शिकवण देत असे.ज्या काळी रोममध्ये सार्वजनिक स्नानगृहे असत, सज्जन लोक सार्वजनिक स्नानगृहात जाऊन आंघोळ करत असत. एकदा क्झेनथसने इसापला स्नानगृहात गर्दी आहे की रिकामे आहे हे पाहून येण्यास सांगितले. इसापने जाऊन पाहिले तर तेथे बरेच लोक आंघोळीसाठी जमा झाले होते. तेवढयात त्याचे लक्ष स्नानगृहाच्या दारासमोर पडलेल्या एका मोठ्या दगडाकडे गेले. अनेक लोक त्या दगडाला अडखळून पडत होते, दगड रस्त्यात कसा म्हणून शिव्या देत होते. तेवढ्यात एक माणूस आला तोही त्या दगडाला अडखळून पडला, त्यानेही शिवी हासडली पण तो दगड त्याने उचलून दूर फेकला आणि मगच तो स्नानगृहात गेला.हे सर्व पाहून इसाप घरी गेला व मालकाला सांगितले की, स्नानगृहात फक्त एकच माणूस आंघोळीसाठी आला आहे. आंघोळीच्या पूर्ण तयारीनिशी क्झेनथस स्नानगृहात पोहोचला आणि पाहतो तर काय, तेथे तर प्रचंड गर्दी आहे. क्झेनथसने इसापला विचारले तू तर म्हणाला इथे फक्त एक माणूस आहे पण इथे तर प्रचंड गर्दी दिसते. इसाप उत्तरला,” इथे रस्त्यात एक दगड पडला होता, येथे येणारा प्रत्येकजण दगडाला अडखळून पडत होता, शिव्या देत होता पण दगड उचलून टाकण्याचे शहाणपण फक्त एकानेच दाखविले. त्यामुळे फक्त एकच माणूस असल्याचे मी आपणास सांगितले.” क्झेनथस निरूत्तर झाला.
तात्पर्य- फक्त जीवंत असणे ही ओळख नसून जीवनाचा सदुपयोगच तुम्हाला स्वतंत्र ओळख देऊ शकते. आपल्या जीवनाचा इतरांनाही उपयोग व्हावा हेच खरे.
📘 दिनांकानुसार पाढा :- १७ चा पाढा
१७ १०२
३४ ११९
५१ १३६
६८ १५३
८५ १७०
⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️
📝 प्रश्नावली 231 📝
प्रश्न १. इसवी सनाच्या सुरुवात कोणाच्या जन्मापासून झाली ?
उत्तर :- येशू ख्रिस्त
प्रश्न २. आण्णा हजारे हे कोणाचे टोपण नाव आहे ?
उत्तर : – किसन बाबुराव हजारे
प्रश्न ३. आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली ?
उत्तर :- रासबिहारी बोस
प्रश्न ४. स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर कोण ?
उत्तर :- सी. राजगोपालाचारी
प्रश्न ५. भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण ?
उत्तर :- प्रतिभाताई पाटील.
⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️
👉 आपल्या माहितीसाठी.
💘झाकीर हुसेन यांचे निधन
◾️जगप्रसिद्ध तबला वादक
◾️जन्म: 09 मार्च 1951(मुंबई)
◾️मृत्यू – 15 डिसेंबर 2024 (सॅन फ्रान्सिस्को, कॅलिफोर्निया, यूएसए)
हुसेनला सात ग्रॅमी पुरस्कार नामांकन मिळाले आहेत, चार विजयांसह, 2024 मध्ये तीन.
◾️झाकीर हुसेन यांना मिलेलेले पुरस्कार
⭐️1988 – पद्मश्री
⭐️1990 – संगीत नाटक अकादमी पुरस्कार
⭐️1990 – इंडो-अमेरिकन पुरस्काराने सन्मानित
⭐️2002 – पद्मभूषण पुरस्कार
⭐️2006 – कालिदास सन्मान
⭐️2009 – ग्रॅमी पुरस्कार
⭐️2012 – गुरु गंगाधर प्रधान जीवनगौरव पुरस्कार
⭐️2018 – संगीत नाटक अकादमी फेलो
⭐️2022 – मानद डॉक्टर ऑफ लॉ (मुंबई विद्यापीठ)
⭐️2023 – पद्मविभूषण पुरस्कार
⭐️2024 – 3 ग्रॅमी पुरस्कार मिळाले वेगवेगळ्या अलब्म साठी (66 वा – 3 पुरस्कार)
◾️झाकीर हुसेन यांना 4 वेळा ग्रॅमी पुरस्कार मिळाला आणि 7 वेळा नामांकन मिळाले
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
✍️ संकलन :- ©चालुघडामोडी 2024 🔥