📖 वाचाल तर वाचाल 📖
📘आजचा परिपाठ 📘
🇮🇳 राष्ट्रगीत 🇮🇳
🇮🇳 राज्यगीत 🇮🇳
🇮🇳प्रतिज्ञा🇮🇳
🇮🇳संविधान उद्देशिका🇮🇳
✒️✒️आज दिनांक :- १९ डिसेंबर २०२४
🔊🔊 आजचा वार :- गुरूवार
📙📘सुविचार :- शिक्षण हे समाज परिवर्तनाचे साधन आहे.
📙📘📙 दिनविशेष
🖊️🖊️ आजचा दिनविशेष – घटना
1927 : राम प्रसाद बिस्मिल, रोशन सिंग आणि अशफाकुल्ला खान या क्रांतिकारकांना ब्रिटीश सरकारने फाशी दिली.
1932 : बीबीसी वर्ल्ड सर्व्हिसने बीबीसी एम्पायर सर्व्हिस म्हणून प्रसारण सुरू केले.
1941 : दुसरे महायुद्ध – ॲडॉल्फ हिटलर जर्मन सैन्याचा कमांडर-इन-चीफ बनला.
1946 : पहिल्या इंडोचायना युद्धाची सुरुवात.
1961 : दमण आणि दीव हे पोर्तुगीज-व्याप्त प्रदेश भारतात समाविष्ट करण्यात आले.
1961 : गोवा मुक्ती दिन.
1963 : झांझिबारला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य मिळाले आणि सुलतान जमशीद बिन अब्दुल्ला शासक बनले.
1972 : अपोलो कार्यक्रम : यूजीन सर्नन, रोनाल्ड इव्हान्स आणि हॅरिसन श्मिट यांना घेऊन गेलेले शेवटचे क्रू चंद्राचे उड्डाण, अपोलो 17, पृथ्वीवर परतले.
1983 : ब्राझीलमधील रिओ दि जानेरो येथून फिफा विश्वचषक चोरीला गेला.
1999 : STS-103 वर स्पेस शटल डिस्कव्हरी लाँच करण्यात आली, तिसरी हबल स्पेस टेलिस्कोप सर्व्हिसिंग मिशन
2002 : व्ही. एन. खरे यांनी भारताचे 33 वे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला.
2013 : युरोपियन स्पेस एजन्सीने स्पेसक्राफ्ट गैया लाँच केले.
🖊️🖊️ आजचा दिनविशेष – जन्म
1852 : ‘अल्बर्ट मायकेलसन’ – वर्णपटाद्वारे प्रकाशाच्या मापनासंबंधीच्या शोधासाठी नोबेल पारितोषिक मिळवणारे जर्मन-अमेरिकन पदार्थवैज्ञानिक यांचा जन्म. (मृत्यू : 9 मे 1931)
1894 : ‘कस्तुरभाई लालभाई’ – पद्मभूषण व राष्ट्रवादी विचारसरणीचे उद्योगपती यांचा जन्म. (मृत्यू : 20 जानेवारी 1980)
1899 : ‘मार्टिन ल्यूथर किंग’ – मानवाधिकारांसाठी आजीवन संघर्ष करणारे नेते यांचा जन्म. (मृत्यू : 11 नोव्हेंबर 1984)
1906 : ‘लिओनिद ब्रेझनेव्ह’ – रशियातील कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस यांचा जन्म. (मृत्यू : 10 नोव्हेंबर 1982)
1919 : ‘ओमप्रकाश बक्षी’ – चरित्र अभिनेते यांचा जन्म. (मृत्यू : 21 फेब्रुवारी 1919)
1934 : ‘प्रतिभा पाटील’ – भारताच्या 12 व्या आणि पहिल्या महिला राष्ट्रपती यांचा जन्म.
1966 : ‘राजेश चौहान’ – भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्म.
1969 : ‘नयन मोंगिया’ – भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्म.
1974 : ‘रिकी पॉन्टिंग’ – ऑस्ट्रेलियन क्रिकेट कर्णधार व फलंदाज यांचा जन्म.
🖊️🖊️ आजचा दिनविशेष – मृत्यू
1848 : ‘एमिली ब्राँट’ – इंग्लिश लेखिका यांचे निधन. (जन्म : 30 जुलै 1818)
1860 : ‘लॉर्ड जेम्स अॅन्ड्र्यू ब्राउन रॅमसे – डलहौसी’ – भारताचे गव्हर्नर जनरल यांचे निधन. (जन्म : 22 एप्रिल 1812)
1915 : ‘अलॉइस अल्झायमर’ – जर्मन मेंदुविकारतज्ञ यांचे निधन. (जन्म : 14 जून 1864)
1927 : ‘राम प्रसाद बिस्मिल’ – क्रांतिकारक यांचे निधन. (जन्म : 11 जून 1897)
1927 : ‘अश्फाक़ुला खान’ – क्रांतिकारक यांचे निधन. (जन्म : 22 ऑक्टोबर 1900)
1927 : ‘ठाकुर रोशन सिंह’ – क्रांतिकारक यांचे निधन. (जन्म : 22 जानेवारी 1892)
1988 : ‘उमाशंकर जेठालाल जोशी’ – गुजराती साहित्यिक यांचे निधन
1997 : ‘डॉ. सुरेन्द्र बारलिंगे’ – स्वातंत्र्यसैनिक, तत्त्वज्ञानाचे अभ्यासक, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष यांचे निधन. (जन्म : 20 जुलै 1919)
1997 : ‘मासारू इबकू’ – सोनीचे सहसंस्थापक यांचे निधन. (जन्म : 11 एप्रिल 1908)
1998 : ‘जनार्दन विठ्ठल रानडे’ – भावगीतगायक यांचे निधन.
1999 : ‘हेमचंद्र तुकाराम दाणी’ – रणजी व कसोटी क्रिकेटपटू, कुशल क्रीडा संघटक यांचे निधन. (जन्म : 24 मे 1933)
2014 : ‘एस. बालसुब्रमण्यम’ – भारतीय पत्रकार आणि दिग्दर्शक यांचे निधन. (जन्म : 28 डिसेंबर 1935)
⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏭️⏭️⏮️
🌍 भाषेवर प्रभुत्व मिळवुया 🌍
📋 📖म्हणी व अर्थ📖 📋
👉 उधारीचे पोते , सव्वा हात रिते – उधारीने घेतलेला माल नेहमीच कमी भरतो .
✒️📖 वाक्प्रचार 📖✒️
👉 साखर पेरणे – गोड गोड बोलून आपलेसे करणे.
✒️📖 शब्दसमुहाबद्दल एक शब्द 📖✒️
👉 ज्याला मरण नाही असा – अमर
⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️
🙏 प्रार्थना 🙏
सत्यम् शिवम् सुंदरा
नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा सत्यम् शिवम् सुंदरा ।। धृ ।।
शब्दरूप शक्ती दे
भावरूप भक्ती दे
प्रगतीचे पंख दे चिमणपाखरा, सत्यम् शिवम् सुंदरा ।।१।।
विद्याधन दे अम्हास
एक छंद, एक ध्यास
नाव नेई. पैलतिरी, दयासागरा, सत्यम् शिवम् सुंदरा ।।२।।
होउ आम्हि नीतिमंत
कलागुणी बुद्धिमंत
किर्तीचा कळस जाय उंच अंबरा, सत्यम शिवम सुंदरा ।।३।।
📝 बोधकथा 📝
एकमेका सहाय्य करू
लोक उद्योगी झाल्याशिवायराष्ट्राचा विकास होत नाही . राजा विलक्षण प्रजेचे पुत्रवत पालन करीत असे. पण प्रजा आळशी असल्यामुळे तो चिंतित होता. दरबारातल्या वयोवृद्धांना त्याने विचारले काय करावे म्हणजे प्रजा कार्यप्रवण होईल? तेव्हा एका वृद्धाने सांगितले त्याप्रमाणे त्याने केले.गजबजलेल्या रस्त्यात एक मोठा दगड ठेवला . जाणारे येणारे दगडाच्या बाजूने जाऊ लागले व दगड ठेवणाऱ्याची निंदा करू लागले. पण दगड हलवण्याचे कोणाच्याही मनात आले नाही. काही दिवसांनी एक माणूस त्या मार्गाने चालला होता. कोणालाही नावे न ठेवता त्याने खूप खटपटीने दगड हलवला. सर्वांची अडचण दूर झाली.राजाने दरबारात त्याचा सत्कार केला. खूप लोक जमले होते राजा मनाला, “पहा याचे उदाहरण. मी राजा खरा, पण लोकांच्या सहाय्यखेरीज,कष्टा खेरीज मी एकटा राज्य वैभवशाली करू शकणार नाही.” आजही आपण अशाच प्रसंगातून जातो आहोत नाही का ?
तात्पर्यः एकमेकांना मदत केली तर कामे
सोपी होतात.
📘 दिनांकानुसार पाढा :- १९ चा पाढा
१९ ११४
३८ १३३
५७ १५२
७६ १७१
९५ १९०
⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️
📝 प्रश्नावली २३३ 📝
प्रश्न १. ओझोन संरक्षण दिन कधी साजरा केला जातो
उत्तर :- 16 सप्टेंबर
प्रश्न २. संविधान सभेची स्थापना केव्हा झाली ?
उत्तर : – 6 डिसेंबर 1946
प्रश्न ३. पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख अधिकारी असतो ?
उत्तर :- गटविकास अधिकारी
प्रश्न ४. सर्वात जास्त लोकसभा मतदारसंघ असलेले भारतातील राज्य कोणते ?
उत्तर :- उत्तर प्रदेश
प्रश्न ५. उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक कोण करते ?
उत्तर :- राष्ट्रपती
⏮️⏭️⏮️📘⏮️⏭️⏮️📘⏮️📘⏭️📘⏮️⏭️⏮️
👉 आपल्या माहितीसाठी.
◾️संजय मल्होत्रा – RBI गव्हर्नर (26 वे)
◾️संजय मूर्ती – भारताचे CAG
◾️शम्मी सिल्वा – आशियाई क्रिकेट कोन्सिल अध्यक्ष
◾️जयतीर्थ राजवेंद्र जोशी – ब्रह्मोस एअरस्पेस चे अध्यक्ष
◾️न्यायमूर्ती बीआर गवई – NALSA चे अध्यक्ष
◾️अरविंदर सिंग साहनी – कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचे अध्यक्ष
◾️डॉ. जयतीर्थ राघवेंद्र जोशी – ब्रह्मोस एरोस्पेस प्रमुख
◾️संजय मूर्ती – पुढील कॅग म्हणून नियुक्ती
◾️अमनदीप जोहल – प्रोफेशनल गोल्फ टूर ऑफ इंडियाचे सीईओ
◾️संजीव खन्ना – 51 वे सरन्यायाधीश
◾️अरविंदर सिंग साहनी – इंडियन ऑइलचे अध्यक्ष
◾️हरभजन आणि सानिया मिर्झा – दुबई स्पोर्ट्स कौन्सिल ॲम्बेसेडर
◾️राजेश कुमार सिंह – नवीन संरक्षण सचिव
◾️हर्षवर्धन अग्रवाल – FICCI अध्यक्ष
◾️विपिन कुमार – भारतीय विमानतळ प्राधिकरण अध्यक्ष
◾️प्रभाकर राघवन – Google चे मुख्य तंत्रज्ञ
◾️सोनू सूद – थायलंड पर्यटन ब्रँड अबॅसिडर
◾️एअर मार्शल अजय कुमार अरोरा – IAF चे एअर ऑफिसर-इन-चार्ज मेंटेनन्स
◾️प्रविणा रॉय – कमोडिटी एक्सचेंज, MCX च्या CEO नियुक्त
◾️विजया रहाटकर – राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्ष
◾️आलोक रंजन – नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) अध्यक्ष
◾️ रश्मी शुक्ला – महाराष्ट्र पोलीस महासंचालक
◾️ डॉ न्गोझी ओकोन्जो-इवेला WTO महासंचालक
◾️मासातो कांड – आशियाई विकास बँकेचे अध्यक्ष
◾️वाल्देसी उर्क्विझा – इंटरपोल चे नवीन सरचिटणीस
◾️प्रीती लोबाना – Google च्या भारतातील प्रमुख
◾️आशिष खन्ना – International Solar Alliance चे अध्यक्ष
——————————————
✍️ संकलन :- ©चालुघडामोडी 2024 🔥