“ज्ञानाची वारी,आली आपल्या दारी.” प्रश्नावली 234 Prashnavali 234

studykatta24.com
studykatta24.com - Teacher
9 Min Read

     📝 वाचाल तर वाचाल 📝

        📘आजचा परिपाठ 📘


                        🇮🇳 राष्ट्रगीत 🇮🇳
                         🇮🇳 राज्यगीत 🇮🇳
                           🇮🇳प्रतिज्ञा🇮🇳
                     🇮🇳संविधान उद्देशिका🇮🇳

✒️✒️आज दिनांक :- २० डिसेंबर  २०२४
🔊🔊 आजचा वार :- शुक्रवार

📙📘सुविचार :- सत्य, इमानदारी, आणि नम्रता ही जीवनातील सर्वोच्च मूल्ये आहेत.


📙📘📙 दिनविशेष


🌍🌍 जागतिक दिन

⚡ आंतरराष्ट्रीय मानव ऐक्य दिन

🖊️🖊️ आजचा दिनविशेष – घटना

1924 : ॲडॉल्फ हिटलरची लँड्सबर्ग तुरुंगातून सुटका.
1945 : मुंबई-बेंगलोर प्रवासी विमानसेवा सुरू झाली.
1971 : झुल्फिकार अली भुट्टो पाकिस्तानचे चौथे राष्ट्रपती बनले.
1994 : राष्ट्रपती डॉ. शंकरदयाळ शर्मा यांनी मलेशियाचे पंतप्रधान डॉ. महाथिर मोहम्मद यांना आंतरराष्ट्रीय सामंजस्यासाठी जवाहरलाल नेहरू पुरस्कार प्रदान केला.
1995 : नाटोने बोस्नियामध्ये शांतता राखण्यास सुरुवात केली.
1999 : पोर्तुगालने मकाऊ बेट चीनला परत केले.
2010 : ज्येष्ठ भाषाशास्त्रज्ञ आणि समीक्षक अशोक केळकर, ज्यांनी भाषेचा अपूर्व अभ्यास केला आणि त्यावर वैविध्यपूर्ण लेखन केले, त्यांना प्रतिष्ठित साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
2019 : युनायटेड स्टेट्स स्पेस फोर्स ही 1947 पासून युनायटेड स्टेट्स सशस्त्र दलाची पहिली नवीन शाखा बनली

🖊️🖊️ आजचा दिनविशेष – जन्म

1868 : ‘हार्वे फायरस्टोन’ – फायरस्टोन टायर आणि रबर कंपनीचे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 7 फेब्रुवारी 1938)
1890 : ‘जेरोस्लॉव्ह हेरॉव्हस्की’ – नोबेल पारितोषिक विजेते झेक रसायनशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 27 मार्च 1967)
1901 : ‘रॉबर्ट व्हॅन डी ग्राफ’ – अमेरिकन पदार्थवैज्ञानिक यांचा जन्म. (मृत्यू : 16 जानेवारी 1967)
1909 : ‘वक्कम मजीद’ – भारतीय पत्रकार आणि राजकारणी यांचा जन्म. (मृत्यू : 10 जुलै 2000)
1940 : ‘यामिनी कृष्णमूर्ती’ – पद्मश्री भरतनाट्यम व कथ्थक नर्तिका यांचा जन्म.
1942 : ‘राणा भगवानदास’ – पाकिस्तानातील पहिले हिंदू मुख्य न्यायाधीश यांचा जन्म.
1945 : ‘शिवकांत तिवारी’ – भारतीय वकील यांचा जन्म. (मृत्यू : 26 जुलै 2010)

🖊️🖊️ आजचा दिनविशेष – मृत्यू

1731 : ‘छत्रसाल बुंदेला’ – बुंदेलखंडचे महाराजा यांचे निधन. (जन्म : 4 मे 1649)
1915 : ‘उपेंद्रकिशोर रे’ – भारतीय चित्रकार आणि संगीतकार यांचे निधन. (जन्म : 12 मे 1863)
1933 : ‘विष्णू वामन बापट’ – संस्कृत विद्वान, भाषांतरकार व शास्त्रसुधारक यांचे निधन. (जन्म : 22 मे 1871)
1956 : ‘संत गाडगे महाराज’ – यांचे निधन. (जन्म : 13 फेब्रुवारी 1876)
1971 : ‘रॉय ओ. डिस्ने’ – द वॉल्ट डिस्ने कंपनीचे सहसंस्थापक यांचे निधन. (जन्म : 24 जून 1893)
1993 : ‘वामन नारायण भट’ – आंतरराष्ट्रीय कीर्तीचे छायाचित्रकार यांचे निधन.
1996 : ‘कार्ल सगन’ – अमेरिकन अंतराळतज्ञ, लेखक व विज्ञानप्रसारक यांचे निधन. (जन्म : 9 नोव्हेंबर 1934)
1996 : ‘दगडू मारुती पवार’ – बलुतं कार दलित लेखक यांचे निधन. (जन्म : 15 सप्टेंबर 1935)
1998 : ‘बंगळुरू वेंकट रमण’ – बंगळुरू वेंकट तथा बी. व्ही. रमण जागतिक कीर्तीचे फलज्योतिषी यांचे निधन. (जन्म : 8 ऑगस्ट 1912)
2001 : ‘लेओपोल्ड सेडर सेन्घोर’ – सेनेगलचे पहिले राष्ट्रपती यांचे निधन. (जन्म : 9 ऑक्टोबर 1906)
2010 : ‘नलिनी जयवंत’ – अभिनेत्री यांचे निधन. (जन्म : 18 फेब्रुवारी 1926)
2010 : ‘सुभाष भेंडे’ – लेखक यांचे निधन. (जन्म : 14 ऑक्टोबर 1936)

🌍🖊️ जागतिक दिन लेख

             आंतरराष्ट्रीय मानव ऐक्य दिन

         दरवर्षी 20 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय मानव ऐक्य दिन साजरा केला जातो. हा दिवस जगभरातील लोकांमध्ये ऐक्य, एकात्मता आणि परस्पर सहकार्याच्या भावनेला प्रोत्साहन देण्यासाठी समर्पित आहे.संयुक्त राष्ट्रांच्या प्रोत्साहनाने स्थापन झालेला हा दिवस, गरिबीचे निर्मूलन, सामाजिक न्याय आणि मानवाधिकार यांसाठी प्रयत्नशील राहण्याची आठवण करून देतो. विविधतेत एकता हीच मानवतेची खरी ओळख आहे. त्यामुळे आपल्याला धार्मिक, सांस्कृतिक, आणि सामाजिक विविधतेला सामावून घेऊन समानतेची भावना जोपासणे महत्त्वाचे ठरते.
           मानव ऐक्य ही गरिबी, भेदभाव, आणि असमानता दूर करण्यासाठी प्रभावी साधन आहे. जेव्हा आपण एकत्र येतो, तेव्हा अधिक चांगल्या आणि न्याय्य समाजाची उभारणी शक्य होते.आंतरराष्ट्रीय मानव ऐक्य दिन आपल्याला परस्पर साहाय्य, सहकार्य, आणि सामूहिक जबाबदारीचे महत्त्व समजावतो. आपण सर्वांनी एकत्र येऊन मानवतेसाठी काम करणे, हाच या दिवसाचा उद्देश आहे. “एकतेतच आपली शक्ती आहे.”


⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏭️⏭️⏮️
   
            🌍 भाषेवर प्रभुत्व मिळवुया 🌍

           📋 📖म्हणी व अर्थ📖 📋

👉 उचलली जीभ लावली टाळ्याला – दुष्परिणामाचा विचार न करता बोलणे .

            ✒️📖 वाक्प्रचार 📖✒️

👉 पाण्यात पाहणे – द्वेष करणे

     ✒️📖 शब्दसमुहाबद्दल एक शब्द 📖✒️

👉 पाहण्यायोग्य वस्तू मांडलेली जागा – प्रदर्शन


⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️

                      🙏 प्रार्थना 🙏

                   इतनी शक्ती हमे देना दाता
इतनी शक्ती हमे देना दाता, मन का विश्वास कमजोर होना
हम चले नेक रस्ते में हम से, भुल कर भी कोई भूल हो ना॥धृ॥

दूर अज्ञान के हो अंधेरे, तू हमे ज्ञान की रोशनी दे।
हर बुराई से बचते रहें हम, जितनी भी दे भली जिंदगी दे।
बैर हो ना किसी का किसी से, भावना मन मे बदले की हो ना।
हम चले नेक रस्ते पे हम से, भूल कर भी कोई भूल हो ना ॥१॥

हम ना सोचे हमे क्या मिला, हम ये सोचे किया क्या है अर्पण।
फुल खुशियों के बाँटे सभी को, सब का जीवन भी बन जाये मधुबन।
अपनी करुणा जल तू बहा के, कर दे पावन हर-एक मन का कोना।
हम चले नेक रस्ते में हम से, भूल कर भी कोई भूल हो ना ॥२॥

                  
                   📝 बोधकथा 📝

                       लालसेपायी जीव गेला
            जय आणि विजय यांच्‍यात घनिष्‍ट मैत्री होती. दोघेही पट्टीचे पोहणारे होते. नदीच्‍या पाण्‍यात भरपूर मस्‍ती केली. तितक्‍यात स्‍थानिक प्रशासनाकडून बंधा-याकडून पाणी सोडण्‍यात येत असल्‍याची सूचना देण्‍यात आली. त्‍यामुळे दोघेही नदीच्‍या बाहेर आले. जेव्‍हा बंधा-यातील पाणी सोडण्‍यात आले तेव्‍हा नदीला पूर आल्‍यासारखी स्थिती निर्माण झाली. जय आणि विजय सुरक्षित स्‍थळी थांबले होते. नदीच्‍या पाण्‍याचा ओघ पाहत असतानाच नदीच्‍या प्रवाहात एक घोंगडी तरंगत येत असल्‍याचे दोघांच्‍याही दृष्‍टीस पडतील. विजयला ती घोंगडी ओढून आणावीशी वाटली. जयने त्‍याला थांबविण्‍याचा प्रयत्‍न केला. परंतु विजयने तोपर्यंत पाण्‍यात उडी मारली होती. तो घोंगडीजवळ गेला आणि तिला ओढत असतानाच त्‍याचे संतुलन बिघडले. विजय जितका जोम लावून किना-यावर येण्‍याचा प्रयत्‍न करत असतानाच पाण्‍यात उठणा-या लाटा त्‍याला दूर लोटत असत. मित्र असा संकटात सापडलेला पाहून जय ओरडला,”अरे मित्रा, घोंगडी सोड आणि परत निघून ये” पण विजय म्‍हणाला,” अरे जय मी घोंगडी सोडण्‍याचा खूप प्रयत्‍न करतो आहे पण घोंगडीनेच मला धरून ठेवले आहे.” जयला कळून चुकले की विजयला त्‍या घोंगडीची लालसा निर्माण झाली आहे. विजयने घोंगडीसह किना-यावर येण्‍याचा खूप प्रयत्‍न केला पण तो अयशस्‍वी ठरला. शेवटी तो पाण्‍यात मृत्‍युमुखी म्‍हणतात.

तात्‍पर्य- कोणत्‍याही प्रकारची लालसा प्रसंगी आपल्‍या जीवाशी खेळू शकते.

       📘 दिनांकानुसार पाढा :- २० चा पाढा

                            २०            १२०
                            ४०            १४०
                            ६०            १६०
                            ८०            १८०
                            १००          २००

  ⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️   

          📝 प्रश्नावली 📝

प्रश्न १. विनोबा भावे यांनी कोणती चळवळ चालू केली ?
उत्तर :- भूदान चळवळ

प्रश्न २. भारतात पहिल्यांदा सूर्य कोणत्या राज्यात दिसतो ?
उत्तर : – अरुणाचल प्रदेश

प्रश्न ३. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते
उत्तर :- राजस्थान

प्रश्न ४. हिमरू शालीसाठी प्रसिद्ध असणारे शहर कोणते ?
उत्तर :-  छत्रपती संभाजीनगर

प्रश्न ५. घड्याळात किती वाजता १८० अंशाचा कोन तयार होतो ?
उत्तर :- ६ वाजता ( सरळकोन )

⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️

👉 आपल्या माहितीसाठी.

भारतातील राज्ये आणि समुद्रकिनारा लांबी.

◼ गुजरात = 1600 km.

◼ तामिळनाडू = 1076 km.

◼ आंध्रप्रदेश = 972 km.

◼ महाराष्ट्र = 720 km.

◼ केरळ = 580 km.

◼ ओडिसा = 480 km.

◼ कर्नाटक = 320 km.

◼ पश्चिम बंगाल = 158 km.

◼ गोवा = 101 km.

◼ अंदमान निकोबार = 1962 km.

◼ लक्षद्वीप = 132 km.

Share This Article