📖 वाचाल तर वाचाल 📖
🌹 प्रश्नावली ५९ 🌹
प्रश्न १. नागपूर विभागाचे प्रादेशिक नाव काय ?
उत्तर :- विदर्भ.
प्रश्न २. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक आहे?
उत्तर :- तिसरा.
प्रश्न ३.क्षेत्रफळाच्या बाबतीत भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते ?
उत्तर :- राजस्थान.
प्रश्न ४. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्ग कोणत्या दोन शहरांना जोडतो ?
उत्तर :- मुंबई आणि नागपूर.
प्रश्न ५. धुळे आणि सोलापूर या दोन ठिकाणांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग कोणता ?
उत्तर :- NH 211 ( नवीन क्रमांक ५२ )
▶️▶️▶️▶️▶️▶️▶️▶️▶️▶️▶️▶️▶️▶️▶️
👉👉 आपल्या माहितीसाठी.
🏅भारतरत्न मिळालेल्या व्यक्तींना मिळतात या सुविधा.🏅
👉 भारतरत्न प्राप्त करणार्या व्यक्तीला कॅबिनेट मंत्र्याच्या समकक्ष व्हीआयपी दर्जा दिला जातो.
👉 आयकर न भरल्यास सूट देखील उपलब्ध आहे.
👉 भारतरत्न प्राप्त व्यक्ती संसदेच्या बैठका आणि अधिवेशनांना उपस्थित राहू शकतात.
👉 देशाचे राष्ट्रीय सण स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून सहभागी होऊ शकतात.
👉 भारतरत्न प्राप्तकर्ते विमान, ट्रेन आणि बसने मोफत प्रवास करू शकतात.
👉 राज्याच्या दौऱ्यावर आल्यावर त्यांना राज्य पाहुण्याचा दर्जा मिळतो.
👉 या पुरस्काराने सन्मानित झालेल्या व्यक्तीला सरकार वॉरंट ऑफ प्रेसिडेंसीमध्ये स्थान देते, ज्याचा उपयोग सरकारी कार्यक्रमांमध्ये प्राधान्य देण्यासाठी केला जातो.
👉 भारतरत्न मिळवणाऱ्या लोकांना राज्य सरकार सुविधा पुरवतात.
👉 नावाला ‘भारतरत्न’ जोडता येत नाही
👉 घटनेच्या कलम 18 (1) नुसार, हा सन्मान प्राप्त करणारी व्यक्ती आपल्या नावाला उपसर्ग किंवा प्रत्यय म्हणून ‘भारतरत्न’ वापरू शकत नाही, परंतु व्हिजिटिंग कार्ड्स, बायोडेटा, पत्रांमध्ये भारतरत्न किंवा राष्ट्रपतींनी प्रदान केलेल्या भारतरत्नचा उल्लेख करू शकतो.