“ज्ञानाची वारी, आली आपल्या दारी.”प्रश्नावली ६०

studykatta24.com
studykatta24.com - Teacher
2 Min Read

📖 वाचाल तर वाचाल 📖

🌹 प्रश्नावली ६० 🌹
प्रश्न १. नुकताच भारतरत्न पुरस्कार कोणाला जाहीर करण्यात आला ?
उत्तर :- लालकृष्ण आडवाणी.
प्रश्न २. 1 फेब्रुवारी रोजी भारताचा अर्थसंकल्प कोणी सादर केला ?
उत्तर :- अर्थमंत्री निर्मला सीतारामन.
प्रश्न ३. महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल कोण आहेत ?
उत्तर :- रमेशजी बैस.
प्रश्न ४. भारताचे विद्यमान उपराष्ट्रपती कोण आहेत ?
उत्तर :- जगदीप धनखड (१४ वे उपराष्ट्रपती )
प्रश्न ५. नुकताच आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थानी विराजमान झालेला पहिला भारतीय वेगवान गोलंदाज कोण ?
उत्तर :- जसप्रीत बुमराह.
📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖

👉👉 आपल्या माहितीसाठी.

*भारताचा महान्यायवादी.*

(Attorney General Of India)

◼️ कलम : भाग – 5 / कलम 76.

◻️ नेमणूक :

1. राष्ट्रपतीद्वारे व त्यांच्या मर्जीनेच पद धारण.

2. सर्वोच्च न्यायालयात न्यायधीश होण्यास पात्रता असलेल्या व्यक्तीची नेमणूक करतात. (राजीनामा – राष्ट्रपतीकडे)

3. कार्यकाळ घटनेमध्ये सांगितलेले नाही. जर मंत्रीमंडळाने राजीनामा दिला तर महान्यायवादी पण राजीनामा देतात. (तसा संकेत आहे)

◼️ कर्तव्य :

1. राष्ट्रपतींद्वारे संदर्भित केल्या जातील अशा विधिविषयक बाबींवर भारत सरकारला सल्ला देणे.

2. भारत सरकारची बाजू सर्वोच्च न्यायालयात मांडणे.

◻️ अधिकार :

1. कलम 76(3): भारतीय क्षेत्रातील सर्व न्यायालयांमध्ये सुनावणीचा /ऐकूण घेतले जाण्याचा अधिकार आहे.

2. कलम 88 : संसदेच्या दोन्ही सदनामध्ये/संयुक्त बैठकीत आणि ते सदस्य असलेल्या समिती मध्ये बोलण्याचा व कामकाजात भाग घेण्याचा अधिकार आहे मात्र तेथे मतदानाचा अधिकार नाही. कारण ते सदस्य नसतात.

3. कलम 105 : संसद सदस्यप्रमाणे सर्व विशेषाधिकार व संरक्षण प्राप्त होते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *