📖 वाचाल तर वाचाल 📖
🛑 प्रश्नावली ७१ 🛑
प्रश्न १.भारतातील सर्वात पहिला चित्रपट कोणता ?
उत्तर :- राजा हरिश्चंद्र.
प्रश्न २. नुकतेच महाराष्ट्र राज्याचे ‘ राज्य शस्त्र ‘ म्हणून कोणत्या शास्त्रास मान्यता मिळाली ?
उत्तर :- दांडपट्टा.
प्रश्न ३. चंद्रावर पाऊल ठेवणाऱ्या पहिला मानव कोण ?
उत्तर :- निळ आर्मस्ट्राँग
प्रश्न ४. चांदबीबी च्या राज्याची राजधानी कोठे होती ?
उत्तर :- अहमदनगर.
प्रश्न ५.अग्निशामक साधनांमध्ये कोणता वायू असतो ?
उत्तर :- कार्बन डायऑक्साइड.
📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖
👉👉 आपल्या माहितीसाठी.
🛑 भारताचा महान्यायवादी 🛑
(Attorney General Of India)
◼️ कलम : भाग – 5 / कलम 76.
▶️. नेमणूक :
1. राष्ट्रपतीद्वारे व त्यांच्या मर्जीनेच पद धारण.
2. सर्वोच्च न्यायालयात न्यायधीश होण्यास पात्रता असलेल्या व्यक्तीची नेमणूक करतात. (राजीनामा – राष्ट्रपतीकडे)
3. कार्यकाळ घटनेमध्ये सांगितलेले नाही. जर मंत्रीमंडळाने राजीनामा दिला तर महान्यायवादी पण राजीनामा देतात. (तसा संकेत आहे)
🛑 कर्तव्य :
1. राष्ट्रपतींद्वारे संदर्भित केल्या जातील अशा विधिविषयक बाबींवर भारत सरकारला सल्ला देणे.
2. भारत सरकारची बाजू सर्वोच्च न्यायालयात मांडणे.
🛑 अधिकार :
1. कलम 76(3): भारतीय क्षेत्रातील सर्व न्यायालयांमध्ये सुनावणीचा /ऐकूण घेतले जाण्याचा अधिकार आहे.
2. कलम 88 : संसदेच्या दोन्ही सदनामध्ये/संयुक्त बैठकीत आणि ते सदस्य असलेल्या समिती मध्ये बोलण्याचा व कामकाजात भाग घेण्याचा अधिकार आहे मात्र तेथे मतदानाचा अधिकार नाही. कारण ते सदस्य नसतात.
3. कलम 105 : संसद सदस्यप्रमाणे सर्व विशेषाधिकार व संरक्षण प्राप्त होते.
🛑राष्ट्रपती संबंधित कलमे.🛑
🔸 52:-भारताचा राष्ट्रपती
🔹 53:-संघराज्य चे कार्यकारी अधिकार
🔸 54:-राष्ट्रपती निवडणूक
🔹 55:-निवडणूक पद्धत
🔸 56:-राष्ट्रपती कार्यकाळ
🔹 57:-पुनर्निवडी साठी पात्रता
🔸 58:-राष्ट्रपती बाबत पात्रता
🔹 59:-पदाच्या अटी
🔸 60:-राष्ट्रपती शपथ
🔹 61:-महाभियोग प्रक्रिया
🔸 62:-निवडणूक घेण्याचा कालावधी
🔹 71:-निवडणूक संबंधित बाबी