“ज्ञानाची वारी, आली आपल्या दारी.” प्रश्नावली ७३.

studykatta24.com
studykatta24.com - Teacher
3 Min Read

“ज्ञानाची वारी, आली आपल्या दारी.” प्रश्नावली ७३.

                      🌹 प्रश्नावली ७३ 🌹





प्रश्न १. इष्टिकाचीतीचे घनफळ काढण्याचे सूत्र सांगा.
उत्तर :- लांबी × रुंदी × उंची

प्रश्न २. वर्तुळाची जीव म्हणजे काय ?
उत्तर :- वर्तुळावरील कोणत्याही दोन बिंदूना जोडणारा रेषाखंड म्हणजे वर्तुळाची जीवा होय.

प्रश्न ३. विशालकोन त्रिकोण म्हणजे काय ?
उत्तर :- ज्या त्रिकोणाचा एक कोण विशालकोन ( ९० अंशापेक्षा मोठा )असतो त्या त्रिकोणाला विशालकोन त्रिकोण म्हणतात.

प्रश्न ४. बंदिस्त आकृतीच्या सर्व बाजूंच्या लांबीची बेरीज म्हणजे त्या आकृतीची —— होय ?
उत्तर :- परिमिती.

प्रश्न ५. परस्परांना लंब असणाऱ्या दोन रेषा कोणत्या प्रकारचा कोन करतात ?
उत्तर :- काटकोन.

📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖

👉👉आपल्या माहितीसाठी

  🔰गणितातील काही महत्वाची एकके   🔰


❗️(१) १ मिनिट = ६० सेकंद .
❗️(२) १  तास = ६० मिनिटे .
❗️(३)  २४ तास  = १ दिवस .
❗️(४) पाव तास =१५ मिनिटे.
❗️(५) अर्धा तास =३० मिनिटे.
❗️(६)  पाऊण तास= ४५ मिनिटे .
❗️(७) ७ दिवस = १ आठवडा.
❗️(८)  ३० दिवस = १ महिना.
❗️(९)  ३६५ दिवस =१ वर्ष .
❗️(१०) १० वर्ष = १ दशक .
❗️(११) अर्धा वर्ष = ६ महिने .
❗️(१२) पाव वर्षे = ३ महिने .
❗️(१३)१ वाजून ३० मिनिटे = दीड वाजतात.
❗️(१४)२ वाजून ३० मिनिटे = अडीच वाजतात .
❗️(१५) एकशे =१००
❗️(१६) अर्धाशे =५०
❗️(१७)  पावशे =२५
❗️(१८) पाऊणशे =७५
❗️(१९) सव्वाशे =१२५
❗️(२०) दीडशे = १५०
❗️(२१) अडीचशे =२५०
❗️(२२) साडेतीनशे =३५०
❗️(२३) १डझन=  १२ वस्तू
❗️(२४) अर्धा डझन =६ वस्तू  .
❗️(२५) पाव डझन=३ वस्तू
❗️(२६) पाऊण डझन=९ वस्तू
❗️(२७) २४ कागद = १ दस्ता
❗️(२८)२० दस्ते=१ रीम
❗️(२९)४८० कागद = १  रीम
❗️(३०) १ गुंठे=  १०८९ चौ .मी
❗️(३१) १ हेक्टर =१०० आर
❗️३२ )१ एकर= ४००० चौ .मी
❗️(३३)१ मीटर= १०० सेंटिमीटर
❗️(३४)अर्धा  मीटर= ५० सेंटिमीटर
❗️(३५) पाव मीटर = २५ सेंटिमीटर
❗️(३६) पाऊण मीटर =७५ सेंटिमीटर
❗️(३७) १ लीटर = १००० मिलिलीटर
❗️(३८)अर्धा  लीटर= ५०० मिलिलीटर
❗️(३९) पाव लीटर = २५० मिलिलीटर
❗️(४०)पाऊण लीटर = ७५० मिलिलीटर
❗️(४१)१ किलोग्रॅम = १०००  ग्रॅम
❗️(४२) अर्धा  किलोग्रॅम=५०० ग्रँम
❗️(४३) पाव किलोग्रॅम=२५० ग्रँम
❗️(४४)  पाऊण किलोग्रॅम = ७५० ग्रँम
❗️(४५) १ किलोमीटर = १००० मीटर
❗️(४६)अर्धा  किलोमीटर  =५०० मीटर
❗️(४७) पाव  किलोमीटर =२५० मीटर
❗️(४८)पाऊण किलोमीटर =७५० मीटर
❗️(४९) १ हजार=१०००
❗️(५०) अर्धा  हजार =५००
❗️(५१) पाव हजार =२५०
❗️(५२) पाऊण हजार  =७५०
❗️(५३)  १२ इंच =१ फूट 
❗️(५४)  ३ फूट =१ यार्ड
❗️(५५)  १ मैल =५२८० फूट
❗️(५६)  १ क्विंटल =१०० किलोग्रॅम
❗️(५७)अर्धा  क्विंटल =५० किलोग्रॅम
❗️(५८) पाव क्विंटल =२५ किलोग्रॅम
❗️(५९) पाऊण क्विंटल = ७५ किलोग्रॅम
❗️(६०) १ टन= १० क्विंटल
❗️(६१) १  टन= १००० कि.ग्रॅ

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *