“ज्ञानाची वारी ; आली आपल्या दारी.”प्रश्नावली ९९ ! Dnyanachi vari ali aplya dari.Prashnavali 99.
📖 वाचाल तर वाचाल 📖
🛑 प्रश्नावली ९९ 🛑
प्रश्न १. ज्या केंद्रशासित प्रदेशात स्वतःची विधानसभा अस्तित्वात नाही, त्या प्रदेशाच्या प्रशासनास कोण जबाबदार असतो ?
उत्तर :- राष्ट्रपती
प्रश्न २. देशात किती केंद्रशासित प्रदेश अस्तित्वात
आहेत ?
उत्तर :- 8
प्रश्न ३ ग्रामपंचायत सदस्यांची संख्या कशावर अवलंबून असते ?
उत्तर :- लोकसंख्येच्या आकारावर
प्रश्न ४. लोकशाहीचे विकेंद्रीकरण व पंचायतराजचे स्वरूप निश्चित करण्यासाठी 1957 मध्ये कोणती समिती स्थापन केली होती ?
उत्तर :- बलवंतराय मेहता समिती.
प्रश्न ५. पोलीस हा विषय भारतीय राज्यघटनेतील कोणत्या सूचीमध्ये आहे ?
उत्तर :- राज्यसूची
📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖
👉👉आपल्या माहितीसाठी
🛑 विभ्याजतेच्या कसोट्या 🛑
✅१ ची कसोटी
१ या संख्येने कोणत्याही संख्येस निःशेष भाग जातो. आणि भागाकार तीच संख्या असते
✅२ ची कसोटी
ज्या संख्येच्या एकक स्थानी ०,२,४,६,८ यापैकी एखादा अंक असतो त्या संख्येस २ ने निःशेष भाग जातो.
✅३ ची कसोटी
दिलेल्या संख्येतील अंकाची बेरीज केल्यास येणाऱ्या बेरजेस जर ३ ने पूर्ण भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येस ३ ने निःशेष भाग जातो.
✅४ ची कसोटी
दिलेल्या संख्येतील एकक व दशक स्थानच्या अंकांना मिळवून तयार होणाऱ्या २ अंकी संख्येस जर ४ने पूर्ण भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येस ४ ने निःशेष भाग जातो. तसेच ज्या संख्येच्या एकक व दशक स्थानी ० येत असेल तर त्या संपूर्ण संख्येस ४ ने निःशेष भाग जातो.
✅५ ची कसोटी
ज्या संख्येच्या एकक स्थानी ० किंवा ५ पैकी एक अंक असेल तर त्या संख्येस ५ ने निःशेष भाग जातो
✅६ ची कसोटी
ज्या संख्येस २ व ३ या दोन्ही संख्येने पूर्ण भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येस ६ ने निःशेष भाग जातो
✅७ ची कसोटी
दिलेल्या संख्येतील एखादा अंक जर क्रमवार ६ च्या पटीत येत असेल तर त्या संपूर्ण संख्येस ७ ने निःशेष भाग जातो.
दिलेल्या संख्येतील एकक स्थानच्या अंकाला २ ने गुणून उरलेल्या संख्येतून वजा केल्यास येणारी वजाबाकी जर ० किंवा ७ च्या पटीत असेल तर त्या संपूर्ण संख्येस ७ ने निःशेष भाग जातो.
✅८ ची कसोटी
दिलेल्या संख्येतील एकक, दशक व शतक स्थानच्या अंकांना मिळवून तयार होणाऱ्या तीन अंकी संख्येस जर ८ ने पूर्ण भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येस ८ ने निःशेष भाग जातो. तसेच ज्या संख्येच्या एकक,दशक व शतक स्थानी ० येत असेल तर त्या संख्येस ८ ने निःशेष भाग जातो.
✅९ ची कसोटी
दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज करून येणाऱ्या बेरजेस जर ९ ने पूर्ण भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येस ९ ने निःशेष भाग जातो.
✅१० ची कसोटी
ज्या संख्येच्या एकक स्थानी ० असते त्या सर्व संख्येस १० ने निःशेष भाग जातो.
✅११ ची कसोटी
दिलेल्या संख्येतील समस्थानी आणि विषमस्थानी असणाऱ्या अंकांची बेरीज करून त्या बेरजेतील फरक जर ० किंवा ११च्या पटीत येत असेल तर त्या संपूर्ण संख्येस ११ ने निःशेष भाग जातो.
✅१२ ची कसोटी
ज्या संख्येला ३ आणि ४ या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस १२ ने निःशेष भाग जातो.
✅१४ ची कसोटी
ज्या संख्येला ७ आणि २ या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस १४ ने निःशेष भाग जातो.
✅१५ ची कसोटी
ज्या संख्येला ३ आणि ५ या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस १५ ने निःशेष भाग जातो.
✅१८ ची कसोटी
ज्या संख्येला २ आणि ९ या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस १८ ने निःशेष भाग जातो.
✅२० ची कसोटी
ज्या संख्येला ४ आणि ५ या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस २० ने निःशेष भाग जातो.
✅२१ ची कसोटी
ज्या संख्येला ७ आणि ३ या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस २१ ने निःशेष भाग जातो.
✅२२ ची कसोटी
ज्या संख्येला २ आणि ११ या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस २२ ने निःशेष भाग जातो.
✅२४ ची कसोटी
ज्या संख्येला ३ आणि ८ या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस २४ ने निःशेष भाग जातो.
✅३० ची कसोटी :-
ज्या संख्येला ३ आणि १० या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस ३० ने निःशेष भाग जातो.
उदाहरणे
खालीलपैकी कोणत्या संख्येस 3 ने निःशेष भाग जाईल
a. 3256 b. 46732 c. 98673 d. 53216
उत्तर :-
a. 3256, 3+2+5+6=16
b. 46732, 4+6+7+3+2=22
c. 98673, 9+8+6+7+3=33
33 या संख्येला ३ ने निःशेष भाग जातो म्हणून पर्याय c याचे उत्तर असेल.