आरटीई प्रवेशासाठी ४ जूनपर्यंत मुदतवाढ.RTE Admission till 4th June.
आरटीई प्रवेशासाठी ४ जूनपर्यंत मुदतवाढ.
पुणे : आरटीई कायद्यातील जुन्या नियमावलीनुसार खाजगी शाळांमधील रिक्त जागांवर प्रवेश मिळावा, यासाठी प्रवेश अर्ज करण्यासाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयातर्फे मुदतवाढ देण्यात आली आहे. पालकांना ४ जूनपर्यंत आरटीई पोर्टलवर ऑनलाईन माध्यमातून प्रवेश अर्ज करता येणार आहेत.
राज्य शासनाने आरटीई कायद्यात केलेल्या बदलांना उच्च न्यायालयाने स्थगिती दिली. शिक्षण विभागाने आरटीईच्या जुन्या नियमावलीनुसार खाजगी शाळांमधील रिक्त २५ टक्के जागांची माहिती आरटीई पोर्टलवर अद्ययावत केली. तसेच, नव्याने ऑनलाईन माध्यमातून अर्ज स्वीकारण्यासाठी १७ ते ३१ मे या कालावधीत मुदत दिली होती.
पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता आणखी काही दिवस मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी केली जात होती. त्यानुसार शिक्षण संचालनालयाकडून अर्ज करण्यासाठी चार दिवसांची मुदतवाढ मिळाली आहे. पालकांना https://student.maharashtra. gov.in/adm_portal या संकेतस्थळावरून प्रवेश अर्ज करता येणार आहेत.
आरटीईअंतर्गत खाजगी शाळांमध्ये रीक्त असलेल्या जागांवर प्रवेशासाठी ४ जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र, त्यानंतर कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ मिळणार नाही.
शरद गोसावी, शिक्षण संचालक, प्राथमिक