5 वी आणि 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा आवेदन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू. Scholarship Exam Form Submission.

studykatta24.com
studykatta24.com - Teacher
2 Min Read

5 वी आणि 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा आवेदन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे.

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा (इ. ५ वी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) दि. ०९ फेब्रुवारी, २०२५ रोजी आयोजित करणेबाबतची अधिसूचना…

शासनमान्य शाळांमधून सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात इयत्ता ५ वी मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांमधील पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा व शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षेमध्ये प्रविष्ठ होण्यासाठी तसेच इयत्ता ८ वी मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांमधील पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेस प्रविष्ट होण्यासाठी अधिसूचनेत नमूद केलेल्या अटी पूर्ण करणाऱ्या व या परीक्षेस प्रविष्ठ होण्यास इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन आवेदनपत्र परिषदेच्या http://www.mscepune.in व https://puppssmsce.in या संकेतस्थळावर दि. १७/१०/२०२४ रोजी पासून उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
            उपरोक्त परीक्षा दि. ०९ फेब्रुवारी, २०२५ रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हयांमध्ये एकाच वेळी घेण्यात येईल. परीक्षेचे वेळापत्रक व परीक्षेची सविस्तर माहिती सोबतच्या अधिसूचनेत नमूद करण्यात आली आहे. प्रत्येक सूचना वाचूनच कार्यवाही करण्याची दक्षता सर्वानी घ्यावी.

सोबत :- अधिसूचना

                             (अनुराधा ओक)
                                    आयुक्त,
                महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे – ०४

👉 अधिसूचना

▶️ परिक्षा फॉर्म भरणे

👉 १७ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर
👉 विलंब शुल्कासह – १५ डिसेंबर
👉 अतिविलंब शुल्कासह – २३ डिसेंबर 
👉 परीक्षा दिनांक – ९ फेब्रुवारी २०२५

👉Website link

1.http://www.mscepune.in

2.https://puppssmsce.in

Share This Article