छत्रपती शिवाजी महाराज यांचे जयंती दिनांक १९ फेब्रुवारी, २०२४ निमित्त विविध उपक्रमासंदर्भात.

studykatta24.com
studykatta24.com - Teacher
4 Min Read




छत्रपती शिवाजी महाराज यांचे जयंती दिनांक १९ फेब्रुवारी, २०२४ निमित्त विविध उपक्रमासंदर्भात
महाराष्ट्र शासन
सामान्य प्रशासन विभाग,

संदर्भ:-
१) सामान्य प्रशासन विभागाचे शासन परिपत्रक क्रमांक : GAD- ४९०२२/१४/२०२३-GAD (DESK-२९), दि.२७.१२.२०२३.
२) सामान्य प्रशासन विभागाचे शासन निर्णय क्र. संकीर्ण-१४२३/प्र.क्र.१२/ कार्या-३१ (राजशिष्टाचार),दि.०१.०२.२०२३
३) सामान्य प्रशासन विभागाचे शासन परिपत्रक क्र. जपुती – २०२३/ प्र.क्र.४२/ कार्या-२९, दि.१५.०२.२०२३.

परिपत्रक :-
या विभागाचे दिनांक २७ डिसेंबर, २०२३ परिपत्रक पहावे. सदर परिपत्रकान्वये राज्यातील राष्ट्र पुरुष/ थोरव्यक्ती यांची जयंती साजरी करण्याबाबतचे निदेश दिले आहेत.
२.शासनामार्फत दरवर्षी दिनांक १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची शासकीय कार्यालयात जयंती साजरी करण्यात येते. दिनांक १९ फेब्रुवारी चे औचित्य साधून या थोरपुरुषांचे ज्या ज्या ठिकाणी पुतळे/स्मारके आहेत, तेथे यावर्षी देखील छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात यावी.
दिनांक १८.०२.२०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता सर्व अधिकारी व संबंधित विभाग प्रमुख यांनी स्वत: पुतळा परिसराची पाहणी करुन संबंधित यंत्रणांकडून रंगरंगोटी, साफसफाई व सुशोभिकरण करुन घेऊन ते झाल्याची खातरजमा करुन घ्यावी.
३.सामान्य प्रशास विभागाच्या दिनांक ०१ फेब्रुवारी, २०२३ शासन निर्णयान्वये महाराष्ट्राच्या राज्यगीताची घोषणा करण्यात आली आहे. या शासन निर्णयातील परिच्छेद क्र.२ नुसार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून सदर गीत दिनांक १९ फेब्रुवारी, २०२३ पासून महाराष्ट्राचे राज्य गीत म्हणून अंगिकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
४.तसेच, दिनांक १९ फेब्रुवारी, २०२४ रोजी सकाळी १०.०० वाजता महाराष्ट्र राज्याच्या राज्य गीताचे गायन करुन सर्व संबंधित वरिष्ठ अधिकारी व संबंधित कार्यालय प्रमुख यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावे. तद्नंतर छोटेखानी सांस्कृतिक समारंभाचे आयोजन करण्यात यावे.
५. उपरोक्त उल्लेखित उपक्रम यशस्वीरित्या पार पाडावयाचे असल्याने, त्याचे योग्य व काळजीपूर्वक नियोजन करणे अत्यावश्यक आहे. त्या दृष्टीने संबंधित यंत्रणांनी दिनांक १९ फेब्रुवारी, २०२४ रोजी होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाचे सर्व बाबींची काटकोरपणे नियोजन करुन अंमलबजावणी करावी.
शासन परिपत्रक क्रमांकः जपुती – २०२४/प्र.क्र.१६/कार्या-जपुक (२९)
सदर परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध करण्यात आले असून, त्याचा सांकेतांक २०२४०२०५१४१०२८१८०७ असा आहे. हे परिपत्रक डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावांने,

( घ. जि. जाधव )
कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन
प्रति,
१.मा. राज्यपाल यांचे प्रधान सचिव, राजभवन, मुंबई.
२.मा. मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई.
३.मा. उप मुख्यमंत्री (गृह, विधि व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, उर्जा, राजशिष्टाचार)
यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई.
४.मा. उप मुख्यमंत्री (वित्त व नियोजन) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
५.सर्व मा. मंत्री यांचे खाजगी सचिव / स्वीय सहाय्यक, मंत्रालय, मुंबई.
६.मा. मुख्य सचिव, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई.
७.अ.मु.स.(प्र.सु.,र.व का.), सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई
८.सर्व अपर मुख्य सचिव / प्रधान सचिव / सचिव, मंत्रालय, मुंबई.
९.सर्व मंत्रालयीन विभाग.
१०.सामान्य प्रशासन विभागातील सर्व कार्यासने
११.सह सचिव, सार्वजनिक बांधकाम विभाग (प्रशा-४), यांना माहिती व आवश्यक त्या कार्यवाहीकरीता.
१२.महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई (प्रसिध्दी देण्यासाठी)
१३सर्व विभागीय आयुक्त.
१४.सर्व जिल्हाधिकारी.
१५.सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी
१६.आयुक्त, सर्व महानगरपालिका
१९.निवासी आयुक्त, महाराष्ट्र सदन, कोपर्निकस मार्ग, नवी दिल्ली
२०.निवड नस्ती (कार्यासन- २९).

सदरील शासन निर्णय मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

Click here for Download.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *