“मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा” हे अभियान राबविण्यासाठी राज्यस्तरीय सुकाणु समिती व राज्यस्तरीय कार्यकारी समिती घटित करणे बाबत.
➡️ प्रस्तावना –
राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळा मधील शिक्षक पालक व विद्यार्थी यांच्यात शाळेप्रती उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी व त्यायोगे स्पर्धात्मक वातावरणातून विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आनंददायी व प्रेरणादायी वातावरण मिळावे यासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत “मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा” हे अभियान राबविण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे. या अभियानाची रूपरेषा निश्चित करणे व त्यावरील देखरेख व नियंत्रण यासाठी राज्यस्तरीय सुखानू समिती तर अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय कार्यकारणी समिती घटत करण्याची बाब देखील शासनाच्या विचाराधीन होती.
⏭️ शासन निर्णय –
“भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा” योजनेअंतर्गत “मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा” या अभियानाची रूपरेषा निश्चित करणे व त्यावरील देखरेख व नियंत्रण यासाठी राज्यस्तरीय सुकाणू समिती तर अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय कार्यकारी समिती खालील प्रमाणे गठीत करण्यास शासनाची मान्यता प्रदान करण्यात येत आहे.
⏭️ अ) राज्यस्तरीय सुकाणू समिती.⏮️
1. मा. मंत्री (शालेय शिक्षण) मंत्रालय मुंबई, अध्यक्ष
2. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग,मंत्रालय ,मुंबई -सदस्य.
3. आयुक्त (शिक्षण)आयुक्तालय,महाराष्ट्र राज्य,पुणे – सदस्य.
4. राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, चर्नी रोड, मुंबई- सदस्य.
5. शिक्षण संचालक प्राथमिक पुणे- सदस्य.
6. शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक पुणे -सदस्य
7. सहसचिव (विद्यार्थी विकास)शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय, मुंबई -सदस्य
8. श्री अमोल शिंदे, खाजगी सचिव, मा. मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष कार्यालय, मंत्रालय, मुंबई -सदस्य
9. श्री अमित हुकेकरी, विशेष कार्यकारी अधिकारी, मा.मुख्यमंत्री कार्यालय, मंत्रालय, मुंबई- सदस्य.
10. खाजगी सचिव,माननीय मंत्री शालेय शिक्षण- सदस्य.
11. उपसचिव (शाळा व्यवस्थापन) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय मुंबई -सदस्य.
12. डॉ अमोल भोर, विशेष कार्यकारी अधिकारी, मा.मंत्री(शालेय शिक्षण) -सदस्य.
12. श्री प्रसाद मोहाडीकर,सुप्रसिद्ध प्रकल्प व्यवस्थापक-सदस्य
13. श्री रघुराम जी, रीड इंडिया -सदस्य.
14. श्री तुषार श्रोत्री, माजी संपादक दैनिक लोकमत- सदस्य.
15. कक्ष अधिकारी (एसडी -६), शालेय शिक्षण व क्रीडा विभाग,मंत्रालय मुंबई -सदस्य सचिव
⏭️ ब. राज्यस्तरीय कार्यकारी समिती⏮️
1. आयुक्त शिक्षण शिक्षण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे-अध्यक्ष.
2.राज्य प्रकल्प संचालक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद चरणी रोड मुंबई – सदस्य
3. संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे,- सदस्य
4. शिक्षण संचालक प्राथमिक ,पुणे -सदस्य
5. शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक पुणे -सदस्य
6. सहसंचालक प्रशासन शिक्षण आयुक्तालय पुणे – सदस्य सचिव
7.सचिव विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व)- सदस्य
8. शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक (सर्व) –
9. प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व)- सदस्य
इ.मु काझी
सहसचिव, महाराष्ट्र शासन.
सदरील शासन निर्णय व परिपत्रक पीडीएफ स्वरूपात पाहिजे असल्यास स खालील लिंक वरून उपलब्ध होईल.