Swami vivekanand! स्वामी विवेकानंद
स्वामी विवेकानंदा चा जन्म १२ जानेवारी १८६३ रोजी कलकत्ता येथे झाला. त्यांचे मूळ नाव नरेंद्र दत्त.त्यांनी घोडेस्वारी आणि गायन या कलाही अवगत केल्या.ते अतिशय खोडकर, तितकेच तापट, पण दयाळू व प्रेमळ होते. असं त्याची त्यांना चीड होती. ते सुदृढ आणि ताकदवान होते. शाळा कॉलेजचे शिक्षण पूर्ण केले.
विवेकानंदांचेे गुरु श्री राम कृष्ण परमहंस यांनी योग्य शक्तीचा वारसा दिला. नरेंद्राने संन्यास स्विकारुन स्वामी विवेकानंद हे नाव धारण केले. नंतर ते हिंदू धर्माचा प्रसार करण्यासाठी अमेरिकेत गेले आणि तेथे शिकागो इथल्या सर्वधर्म संमेलनात सहभागी झाले. येथील त्यांचे पहिलेच भाषण खूप गाजले. नंतर इंग्लंडमध्ये जाऊन त्यांनी अनेकांना उपदेश केला.
परदेशात आणि भारतात अनेक ठिकाणी फिरल्यावर स्वामीजी परत कलकत्त्याला आले. त्यांनी श्री रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना केली. दुसऱ्यांदा अमेरिकेला भेट देऊन आल्यावर ४ जुलै १९०२ रोजी बेलूर मठामध्ये त्यांनी देहत्याग केला. कन्याकुमारी जवळ समुद्रात असलेल्या खडकावर स्वामीजी एक भव्य स्मारक उभारण्यात आले आहे.