शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये UDISE प्रणालीमध्ये माहिती संकलित करण्याबाबत.

studykatta24.com
studykatta24.com - Teacher
3 Min Read

शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये UDISE प्रणालीमध्ये माहिती संकलित करण्याबाबत.

प्रति,
१. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे
२. राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, चर्नी रोड, मुंबई.
३. शिक्षण संचालक ( प्राथमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे.
४. शिक्षण संचालक (माध्यमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे.

विषय:- शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये UDISE प्रणालीमध्ये माहिती संकलित करण्याबाबत.

संदर्भ:- सचिव, शिक्षण मंत्रालय, शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग, भारत सरकार यांचे दि.२८.०३.२०२४ रोजीचे अर्धशासकीय पत्र,

महोदय,
उपरोक्त विषयावरील संदर्भाधीन अर्थशासकीय पत्राची प्रत सोबत जोडली आहे.

२.बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम, २००९ अन्वये स्थानिक प्राधिकरण यांचेमार्फत माहितीचे संकलन आणि माहिती व्यवस्थापन करणे अनिवार्य आहे. आरटीई कायद्यांतर्गत माहिती संकलन आणि शाळांना युनिक यु-डायस कोड देण्यासाठी UDISE + यंत्रणा विकसित करण्यात आली आहे.

३.संदर्भाधीन पत्रान्वये शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी UDISE प्रणालीमध्ये माहिती भरण्यासाठीराज्यांना दि.०१.०४.२०२४ पासून पोर्टल उघडण्यात येणार आहे. तसेच दि.३१.०७.२०२४ पर्यंत राज्यांनी माहिती भरुन दि. ३०.०९.२०२४ पर्यंत अंतिम प्रमाणपत्रता (Final Certification) पूर्ण करणे अपेक्षित आहे.

४. नवीन शैक्षणिक धोरण, २०२० मध्ये नमूद केल्याप्रमाणे विद्याध्यांची नावनोंदणी व एकूण नोंदणी दर (Gross Enrollment Ratio) १०० टक्क्यांपर्यंत वाढविण्यासाठी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कुलिंग (NIOS) मध्ये नावनोंदणी केलेल्या १४-ते १७ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी डाटा कॅप्बर फ़ॉरमेंट (Data Capture Format) यंत्रणा विकसित केली असून त्यासंबंधी माहिती NIOS यांचेमार्फत संकलित करण्यात येत आहे. याव्यतिरिक्त अनौपचारिकरित्या शिक्षण देणा-या संस्था (UDISE कोडशिवाय) (उदा. खाजगी पूर्व प्राथमिक शाळा, शासनाची मान्यता नसणा-या शाळा तसेच स्वतंत्र कौशल्य केंद्रे) मधील विद्यार्थ्यांच्या नोंदणी व उक्त संस्था यांच्या संदर्भातील माहिती संकलित करण्यासाठी डाटा कॅप्चर फ़ॉरमॅट BRC/CRC मध्ये व्यवस्था करण्यात आली असून त्यासंबंधी दि. २३.०३.२०२३ रोजीच्या पत्रान्वये सूचना देण्यात आल्या आहेत. तथापि ब-याच राज्यांकडून सदर व्यवस्थेचा वापर करण्यात येत नसल्याबाबत आढळून आले आहे. तसेच ब-याच राज्यांनी UDISE २०२३-२४ मधील माहिती अद्यापि संकलित केली नसून Data Duplication u Drop Box Issue यासंदर्भात कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. सदर प्रकरणी तातडीने कार्यवाही करणे अपेक्षित आहे.

५. केंद्र शासनाच्या उपरोक्त पत्राच्या अनुषंगाने, शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये UDISE प्रणालीवर माहितीचे संकलन योग्यरित्या करुन Data Duplication व Drop Box Issue संदर्भातील कार्यवाही तातडीने करावी. UDISE प्रणालीमध्ये माहितीचे वेळेत संकलन न झाल्यास आरटीई कायद्याचे उलंघन होत असल्याने सदर प्रकरणी कालमर्यादेत कार्यवाहो करण्याबाबत आपल्या स्तरावरुन संदर्भाधीन पत्रात नमूद केल्याप्रमाणे संबंधितांना सूचना देण्यात याव्यात, हि विनंती.


                                       तुषार महाजन
                                उप सचिव, महाराष्ट्र शासन.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *