विभाज्यतेच्या कसोट्या.divisibility rules
♀️विभाज्यतेच्या कसोट्या divisibility rules
✅२ ची कसोटी
ज्या संख्येच्या एकक स्थानी ०,२,४,६,८ यापैकी एखादा अंक असतो त्या संख्येस २ ने निःशेष भाग जातो.
✅३ ची कसोटी
दिलेल्या संख्येतील अंकाची बेरीज केल्यास येणाऱ्या बेरजेस जर ३ ने पूर्ण भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येस ३ ने निःशेष भाग जातो.
✅४ ची कसोटी
दिलेल्या संख्येतील एकक व दशक स्थानच्या अंकांना मिळवून तयार होणाऱ्या २ अंकी संख्येस जर ४ने पूर्ण भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येस ४ ने निःशेष भाग जातो. तसेच ज्या संख्येच्या एकक व दशक स्थानी ० येत असेल तर त्या संपूर्ण संख्येस ४ ने निःशेष भाग जातो.
✅५ ची कसोटी
ज्या संख्येच्या एकक स्थानी ० किंवा ५ पैकी एक अंक असेल तर त्या संख्येस ५ ने निःशेष भाग जातो.
✅६ ची कसोटी
ज्या संख्येस २ व ३ या दोन्ही संख्येने पूर्ण भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येस ६ ने निःशेष भाग जातो.
✅८ ची कसोटी
दिलेल्या संख्येतील एकक, दशक व शतक स्थानच्या अंकांना मिळवून तयार होणाऱ्या तीन अंकी संख्येस जर ८ ने पूर्ण भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येस ८ ने निःशेष भाग जातो. तसेच ज्या संख्येच्या एकक,दशक व शतक स्थानी ० येत असेल तर त्या संख्येस ८ ने निःशेष भाग जातो.
✅९ ची कसोटी
दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज करून येणाऱ्या बेरजेस जर ९ ने पूर्ण भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येस ९ ने निःशेष भाग जातो.
✅१० ची कसोटी
ज्या संख्येच्या एकक स्थानी ० असते त्या सर्व संख्येस १० ने निःशेष भाग जातो.
✅११ ची कसोटी
* दिलेल्या संख्येतील सम स्थानच्या अंकांची बेरीज करून व विषम स्थानच्या अंकांची बेरीज करून त्यांच्यातील फरक काढला असता तो ० किंवा ११ च्या पटीत येत असेल तर त्या संख्येला ११ ने निःशेष भाग जातो किंवा ती संख्या ११ ने विभाज्य असते.
उदा. (१) ५२९५६२
५+९+६=२० आणि २+५+२ =९ आता वजाबाकी करू २०-९=११
म्हणून ५२९५६२ हि संख्या ११ ने विभाज्य आहे.
(२) ४५३२४.
४+३+४=११ आणि ५+२=७ आता वजाबाकी करू ११-७=४
म्हणून ४५३२४ हि संख्या ११ ने विभाज्य नाही.
(३) ८९४६३.
८+४+३=१५ आणि ९+६=१५ आता वजाबाकी करू १५-१५=०
म्हणून ८९४६३ हि संख्या ११ ने विभाज्य आहे.
✅१२ ची कसोटी
* ज्या संख्येला ३ ने व ४ ने भाग जातो त्या संख्येला १२ ने निःशेष भाग जातो किंवा ती संख्या १२ ने विभाज्य असते.
उदा. ४८,१०८,३०० इ.
✅१५ ची कसोटी
* ज्या संख्येला ३ ने व ५ ने भाग जातो त्या संख्येला १५ ने निःशेष भाग जातो किंवा ती संख्या १५ ने विभाज्य असते.
उदा. ४५,९०,१८०,१८६० इ.
✅१८ ची कसोटी
* ज्या संख्येला २ ने व ९ ने भाग जातो त्या संख्येला १८ ने निःशेष भाग जातो किंवा ती संख्या १८ ने विभाज्य असते.
उदा. १२६,८१०,२७७२ इ.
✅२० ची कसोटी
* ज्या संख्येला ४ व ५ या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या संख्येस २० ने निःशेष भाग जातो किंवा ती संख्या २० ने विभाज्य असते.
उदा.५४०,१७४०,१६९८० इत्यादी.
✅२१ ची कसोटी
* ज्या संख्येला ७ व ३ या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या संख्येस २१ ने निःशेष भाग जातो किंवा ती संख्या २१ ने विभाज्य असते.
उदा. ४८३,२०१६,१२३२७ इत्यादी
✅२२ ची कसोटी
* ज्या संख्येला २ व ११ या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या संख्येस २२ ने निःशेष भाग जातो किंवा ती संख्या २२ ने विभाज्य असते.
उदा. ७९२,१८२६,१५०४८ इत्यादी
✅२४ ची कसोटी
* ज्या संख्येला ३ व ८ या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या संख्येस २४ ने निःशेष भाग जातो किंवा ती संख्या २४ ने विभाज्य असते.
उदा. १२९६,२२५६,२०७१२ इत्यादी.
✅३० ची कसोटी
* ज्या संख्येला ३ व १० या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या संख्येस ३० ने निःशेष भाग जातो किंवा ती संख्या ३० ने विभाज्य असते.
उदा. १२००,२८८०,२९६१० इत्यादी