यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक सन 2024-2025 या शैक्षणिक वर्षाची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया.YCMOU nashik online admission 2024 – 25.
सूचनापत्रक
१) विद्वत परिषदेने घेतलेल्या निर्णयानुसार बी.एड., बी.एड. (विशेष), शिक्षणक्रमांव्यतिरिक्त उर्वरित सर्व शिक्षणक्रमांची सन 2024-2025 या शैक्षणिक वर्षाची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया खालील तक्यात नमूद केलेल्या वेळापत्रकाप्रमाणे सुरू होत आहे.
क्र.1
तपशील – ऑनलाईन प्रवेश अर्ज विनाविलंब शुल्क भरण्याची मुदत
मुदत – दिनांक 01.06.2024 ते दिनांक 31.07.2024 पर्यंत (संध्याकाळी 11.59 वाजेपर्यंत)
https://ycmou.digitaluniversity.ac/Content.aspx?ID=1303
२) विद्यार्थ्यास ज्या शिक्षणक्रमाला प्रवेश घ्यावयाचा आहे. त्यासाठी विद्यापीठाच्या संकेतस्थळावरील होमपेजवर जाऊन Admission या टॅबवर Prospectus (माहितीपुस्तिका) 2024-25 या ठिकाणी विविध शिक्षणक्रमांच्या माहितीपुस्तिका उपलब्ध आहेत.
३) प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांने वर नमूद केलेल्या विहित कालावधीत ऑनलाईन पद्धतीने पूर्णपणे व अचूक भरलेला प्रवेश अर्ज आणि प्रवेश घेत असलेल्या शिक्षणक्रमाचे शुल्कही ऑनलाईन पद्धतीने भरून विद्यार्थ्यास प्रवेश अर्ज सादर करता येईल.
४) विद्यार्थ्यांनी वर दिलेल्या विहित मुदतीतच ऑनलाईन प्रवेश अर्ज भरून आपला प्रवेश निश्चित करावा.
उपकुलसचिव नोंदणी कक्ष
मार्फत मा. संचालक, विद्यार्थी सेवा विभाग
प्रत : 1) मा. कुलगुरू यांचे माहितीसाठी सविनय सादर
2) मा. प्र-कुलगुरू यांचे माहितीसाठी सविनय सादर
प्रत: 1) सर्व वरिष्ठ शैक्षणिक सल्लागार, य.च.म.मु. विद्यापीठाचे विभागीय केंद्र यांनी सदरचे सूचनापत्र आपल्या अधिनस्त असलेल्या सर्व अभ्यासकेंद्रांच्या निदर्शनास आणून द्यावे.
2) सर्व विद्याशाखा/केंद्र/कक्ष
3) एम.के.सी.एल.
4) डाटा प्रोसेसिंग सुपरवायझर, विद्यार्थी सेवा विभाग
dsmita650@gmail.com